Ration Card Latest Update 2024: रेशन कार्ड धारकांसाठी एक खूप महत्त्वाचा अपडेट. तुमचं रेशन कार्ड(Ration Card) बंद होऊ शकतं. तुम्हाला जर रेशन मिळत असेल तर तुमचं रेशन बंद होऊ शकतं. काय आहे हा पूर्ण अपडेट? आपण पुढे माहिती घेणार आहोत.
अन्न पुरवठा विभागामार्फत एक नोटीस जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही स्क्रीनवर नोटीस पाहू शकता. महाराष्ट्र शासन अन्न पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार, अहवाल काढण्यात आलेला आहे.
तर अहवाल काय सांगतो? पुढे स्क्रीनवर पाहा. सिधा पत्रिका धारकांसाठी जाहीर अहवाल करण्यात आला आहे. सिधा पत्रिकेमधील ज्या सदस्यांचा मृत्यू झाला आहे, परंतु त्यांचे नाव पत्रिकेत अजूनही आहे, त्या कुटुंबांनी लवकरात लवकर त्या मृत व्यक्तीचं नाव सिधा पत्रिकेतून कमी करावं.
त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, ते पाहू. आवश्यक कागदपत्रांमध्ये मृत व्यक्तीचा मृत्यू दाखला, आधार कार्ड, आणि सिधा पत्रिका ही तीन डॉक्युमेंट्स लागणार आहेत.
त्याचप्रमाणे, पुढे केवाईसी बद्दल काय माहिती आहे, तेही आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या, या नोटीसमध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की तुमच्या सिधा पत्रिकेत किंवा रेशन कार्डमध्ये जेवढ्या व्यक्तींची नावे आहेत, त्या सर्वांचे आधार कार्ड घेऊन रेशन दुकानात जा आणि सर्व व्यक्तींची आधार वेरिफिकेशन किंवा ई-केवाईसी (केवाईसी) करून घ्या.
ज्या व्यक्ती शिधा पत्रिकेवर किंवा रेशन कार्डवर धान्य किंवा इतर वस्तू घेतात, त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची केवाईसी करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही केवाईसी केली नाही, तर तुमचं रेशन मिळणं बंद होऊ शकतं, असं या नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे.
त्याचप्रमाणे, एखाद्या व्यक्तीची केवाईसी राहिल्यास त्या व्यक्तीचं नाव सिधा पत्रिकेतून कमी होऊ शकतं.
आता लास्ट डेट लक्षात ठेवा – 31 ऑक्टोबर 2024. 31 ऑक्टोबरच्या आत तुम्हाला कुटुंबातील सर्व व्यक्तींची केवाईसी करणं बंधनकारक आहे. जर तुम्ही असं केलं नाही, तर त्या व्यक्तीचं नाव सिधा पत्रिकेतून कमी होईल किंवा त्या व्यक्तीला धान्य किंवा अन्य साहित्य मिळणं बंद होईल.
हे सुद्धा वाचा– तुमच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा झाले का?-Mukhyamantri Vayoshri Yojana 2024