Kharip Pik 2024- मित्रांनो, खरीप हंगाम 2024 करताची सुधारित पैसेवारी जाहीर झालेली आहे आणि याच्या संदर्भातील काही महत्त्वाची अशी माहिती अपडेट आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्यामध्ये जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये विविध भागांमध्ये अतिवृष्टी, जोरदार पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. काही जिल्ह्यांमध्ये नजर अंदाज पैसेवारी 50 पैशांच्या खाली, तर काही जिल्ह्यांमध्ये 50 पैशांच्या वरती जाहीर करण्यात आलेली होती. आणि याच्याचमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे आता लक्ष लागलेलं होतं ते म्हणजे पैसेवारीकडे. या पैसेवारीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत मिळेल की नाही, हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे.
आपण पाहिलेले की ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी काही मदत वितरित करण्यात आलेली होती. मात्र, यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये मदतीचे वितरण अद्याप बाकी होतं. फक्त परभणी आणि लातूर जिल्ह्यासाठी मोठी मदत वितरित करण्यात आलेली होती.
इतर जिल्हे मदतीच्या प्रतीक्षेत होते आणि आता या सुधारित पैसेवारी व अंतिम पैसेवारीच्या आकडेवारीवरच या जिल्ह्यांमध्ये मदतीचं चित्र स्पष्ट होणार होतं. काही जिल्ह्यांचे प्रस्ताव गेलेले आहेत, परंतु अद्याप ते मंजूर झालेले नाहीत. त्या शेतकऱ्यांना मदत आलेली नाही, परंतु या सुधारित पैसेवारीच्या आकड्यावरून या जिल्ह्यांना मदत मिळणार का, हे चित्र आता स्पष्ट होत चाललेलं आहे.
मित्रांनो, आपल्याकडे आता सहा जिल्ह्यांचा डेटा उपलब्ध झालेला आहे, ज्यामध्ये अमरावती, नंदुरबार, परभणी, हिंगोली, नांदेड आणि अकोला या जिल्ह्यांची सुधारित पैसेवारी उपलब्ध आहे. ती माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
अमरावती जिल्हा:
अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 2013 लागवडी योग्य गाव आहेत आणि या गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. जी सरासरी पाहिलं तर 60 पैसे आहे. यामध्ये:
- अमरावती तालुका: 55 पैसे
- भातकुली तालुका: 54 पैसे
- तिवसा तालुका: 56 पैसे
- चांदूर रेल्वे: 58 पैसे
- धामणगाव रेल्वे: 60 पैसे
- नांदूर खंडेश्वर: 54 पैसे
- मोरशी: 59 पैसे
- वरुड: 55 पैसे
- अचलपूर: 59 पैसे
- चांदूर बाजार: 57 पैसे
- दर्यापूर: 55 पैसे
- अंजनगाव सुरजी: 54 पैसे
- धारणी: 59 पैसे
- चिखलदरा: 54 पैसे
असे एकूण 14 तालुक्यातील पैसेवारी 50 पैशांच्या वरती आहे.
नांदेड जिल्हा:
नांदेड जिल्ह्याचा मदतीसाठी 800 कोटींपेक्षा जास्त प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे, जो आचारसंहितेमुळे अडकलेला आहे.
- नांदेड तालुका: 48 पैसे
- अर्धापूर तालुका: 48 पैसे
- कंधार: 48 पैसे
- लोहा: 47 पैसे
- भोकर: 49 पैसे
- मोंढखेड: 49 पैसे
- हदगाव: 49 पैसे
- हिमायतनगर: 48 पैसे
- किनवट: 48 पैसे
- माहूर: 48 पैसे
- देंगलूर: 49 पैसे
- मुखेड: 48 पैसे
- बिलोली: 44.5 पैसे
- नायगाव: 48.91 पैसे
- धर्माबाद: 49 पैसे
- उमरी: 49 पैसे
नांदेड जिल्ह्याची सरासरी पैसेवारी 50 पैशांपेक्षा खाली आहे, त्यामुळे मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
नंदुरबार जिल्हा:
नंदुरबार जिल्ह्यातील 857 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त आहे.
- नंदुरबार तालुका: 145 गाव
- नवापूर तालुका: 165 गाव
- शहादा: 160 गाव
- तळोदा: 94 गाव
- अक्कलकुवा: 194 गाव
- धडगाव: 91 गाव
परभणी जिल्हा:
परभणी जिल्ह्यातील पैसेवारी:
- परभणी तालुका: 46 पैसे
- जिंतूर तालुका: 47.60 पैसे
- शेलूर तालुका: 48 पैसे
- मानवत तालुका: 47.56 पैसे
- पाथरी तालुका: 47 पैसे
- सोनपेठ तालुका: 45.44 पैसे
- गंगाखेड: 48.25 पैसे
- पालम: 48 पैसे
- पूर्णा: 47.86 पैसे
परभणी जिल्ह्यातील पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे.
हिंगोली जिल्हा:
हिंगोली जिल्ह्यातील पंचनामे करून प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे.
- हिंगोली: 49.13 पैसे
- कळमनुरी: 48.27 पैसे
- वसमत: 48 पैसे
- औंढा नागनाथ: 47.14 पैसे
- शेणगाव: 48.5 पैसे
हिंगोली जिल्ह्याची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे.
मित्रांनो, अशा प्रकारे या सहा जिल्ह्यांची सुधारित पैसेवारी उपलब्ध झालेली आहे. इतर जिल्ह्यांची सुधारित पैसेवारीसुद्धा लवकरच उपलब्ध होईल.-Kharip Pik Update 2024.
हे सुद्धा वाचा– सोयाबीन 6000 रुपये भावाची घोषणा 2024-MSP For Soyabean