Kusum Solar Pump Yojana 2024- मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचं संदर्भातील एक अतिशय दिलासा देणारं महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्यात प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ राबवली जात आहे, ज्यामध्ये राज्यातील लाखो लाभार्थी पात्र ठरवून या योजनेचा लाभ देण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे. याच योजने अंतर्गत ज्या लाभार्थींना ‘सेल्फ सर्वे’ पेमेंटसाठी मेसेज देण्यात आले होते, अशा लाभार्थींना 24 ऑक्टोबर 2024 ची शेवटची तारीख देऊन शेवटची मुदत देण्यात आली होती. या लाभार्थींना आपला ‘सेल्फ सर्वे’ पेमेंट करण्यासाठी सांगितले गेले होते, ज्याने करून या लाभार्थ्यांना ‘सेल्फ सर्वे’ पेमेंट केल्यानंतर पुढील प्रक्रियेत समाविष्ट करण्यात येईल आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यात लाभार्थी पात्र करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार होती.
याच अनुषंगाने, 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत ज्या लाभार्थींनी आपला ‘सेल्फ सर्वे’ पेमेंट केले आहे, त्यांना पुढील प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आलेले आहे. ज्यांनी पेमेंट केले त्यांचे अर्ज आता छाटणी करून बाजूला ठेवले जात आहेत, आणि नवीन लाभार्थींना पात्र करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. याच्या अंतर्गत, 25 ऑक्टोबर 2024 पासून नवीन लाभार्थींना ‘सेल्फ सर्वे’ करण्यासाठी पेमेंट करण्यासाठी मेसेज देण्यात आलेले आहेत.
याच्या अंतर्गत आपली निवड झाली असेल तर आपल्याला जर मेसेज आलेला असेल, तर आपल्याला या योजनेत पात्र होण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी आपल्या शेतीत ‘सेल्फ सर्वे’ करावा लागणार आहे. ‘सेल्फ सर्वे’ केल्यानंतर आपल्याला पेमेंट करावे लागणार आहे. मित्रांनो, ‘सेल्फ सर्वे’ कसा करायचा, याबद्दल आपण यापूर्वी सविस्तर माहिती घेतली आहे.
सांगितलेल्या माहितीप्रमाणे, आपल्या शेतीतील जे काही सिंचन साधन असेल त्याजवळ उभे राहून 24 तासांत पेमेंट करण्याची पर्याय दिला जाईल. यानंतर, एचपी, पाच एचपी ची क्षमता, आणि आपल्या प्रवर्गानुसार (एससी, एसटी किंवा ओपन) निश्चित केलेली रक्कम आपल्याला पेमेंट करण्यासाठी दिली जाईल. हा पेमेंट केल्यानंतर, ‘वेंडर सिलेक्शन’ आणि पुढील प्रक्रिया सुरु होईल.
तर, खूप मोठ्या प्रमाणात या योजने अंतर्गत अर्ज करून पुढील टप्प्यात समाविष्ट होण्यासाठी लाभार्थी प्रतीक्षेत होते. अशा लाभार्थींना या टप्प्यात आता दिलासा मिळाला आहे. लवकरच याची इन्स्टॉलेशन प्रक्रिया सुद्धा सुरू होईल, कारण अनेक लाभार्थ्यांनी पेमेंट केले असून, वेंडर निवडले आहेत, त्यांचे जॉइंट सर्वे देखील झाले आहेत. परंतु अद्याप त्यांचे सोलर पंप बसवले गेलेले नाहीत. निवडणुकीचे आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे प्रक्रियेला थोडा विलंब झाला आहे. निवडणुका झाल्यानंतर या प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात गती मिळेल. तोपर्यंत लाभार्थींनी दिलेल्या बाबी पूर्ण करून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून पुढील टप्प्यात समाविष्ट होण्यासाठी तयारीत राहता येईल.-Kusum Solar Pump Yojana Update.
हे सुद्धा वाचा– खरीप रब्बी पीकविमा मंजूर-Pik Vima Maharashtra