एक रुपयात रब्बी पीक विमा-Rabbi Pik Vima 2024

Rabbi Pik Vima 2024- विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी देशभरात प्रधानमंत्री पीकविमा योजना राबवली जात आहे. आणि याच योजनेचा आधीन राहून राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यात सर्वसमावेशक पीकविमा योजना राबवली जात आहे. याच अंतर्गत आता रबी हंगाम 2024-25 करता ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू होणार आहे.

मात्र हे अर्ज भरले जात असताना शेतकरी एक रुपयामध्ये पीकविमा(Pik Vima) भरता येणार का हा देखील मोठ्या प्रमाणात पडलेला प्रश्न होता. मित्रांनो, एकीकडे आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम 2023 पासून राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यात सर्वसमावेशक पीकविमा योजना राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे.

त्याची सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये 2023-24, 2024-25 आणि 2025-26 या तीन वर्षांसाठी राज्यात सर्वसमावेशक पीकविमा योजना(Pik Vima Yojana) राबवून खरीप हंगाम आणि रबी हंगाम या दोन्ही हंगामांत शेतकऱ्यांना केवळ एक रुपयामध्ये नोंदणी करण्याची संधी मंजूर करण्यात आलेली होती. याच अंतर्गत खरीप हंगामामध्ये 1 कोटी 65 लाख शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये आपला सहभाग देखील नोंदवला आहे.

साधारणपणे 28 ऑक्टोबरनंतर, 1 नोव्हेंबरच्या आसपास या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू होणार आहे. ज्याच्या अंतर्गत शेतकरी ज्वारी (बागायती आणि जिरायती) या दोन्ही प्रकारच्या पिकांसाठी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत आपले अर्ज सादर करू शकतील. त्याच प्रमाणे हरभरा किंवा गहू (बागायती) यासाठी शेतकरी 15 डिसेंबर 2024 पर्यंत आपले अर्ज दाखल करू शकतील. आणि उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमूग या दोन्ही पिकांसाठी रबी हंगाम 2024 करता 31 मार्च 2025 पर्यंत शेतकरी आपले अर्ज दाखल करू शकणार आहेत. आणि या हंगामामध्ये देखील शेतकरी एक रुपयामध्ये आपला सहभाग नोंदवू शकतील.-Rabbi Pik Vima Update.

हे सुद्धा वाचातुम्हाला आला का सोलरचा मेसेज ?-2024

Leave a Comment