तुमची पीकविमा पॉलिसी Paid की Approved?-Pik Vima Status 2024

Pik Vima Status 2024- प्रधानमंत्री पीकविमा योजने अंतर्गत आपल्या पिकाचा पीकविमा भरल्यानंतर आपल्या पॉलिसीची स्थिती चेक करत असताना शेतकऱ्यांना “पेड” अथवा “अपडेट” अशा प्रकारे दर्शवले जाते, आणि बरेच शेतकरी पॉलिसी “अपडेट” दर्शवते तर काही शेतकरी पॉलिसी “पेड” दर्शवते. या “पेड” आणि “अपडेट” नेमकं काय आहे, “पेड” अपडेट कधी होते, “अपडेट” झालं म्हणजे पीकविमा मंजूर झाला का, असे बरेच प्रश्न सातत्याने विचारले जातात, आणि याच अनुषंगाने एक महत्त्वाची माहिती आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पीकविमा योजना(Pik Vima Yojana) राबवित असताना पीकविमा जो जीआर असेल, आता जसे आपण पाहिले की 2023 मध्ये तीन वर्षांसाठी ही योजना राबविण्यासाठी जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि याच्या मधील मुद्दा क्रमांक 9 नुसार योजनेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे. की खरीप व रबीसाठी शेतकऱ्यांना पीकविमा कधी भरता येणार, त्याची अंतिम तारीख काय असणार. याच बरोबर ही तारीख झाल्यानंतर त्याची पुढची जी काही अंमलबजावणी असेल, त्यानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या पॉलिसीबाबत माहिती मिळेल.

आता आपण पाहिले की “देश मेरी पॉलिसी मेरे हाथ” हे अभियान राबविले जाते, ज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या पॉलिसीची हार्ड कॉपी त्या ठिकाणी पोच केली जाते. अशा परिस्थितीत ही पॉलिसी नेमकी अपडेट कधी होणार? कारण आजही खरीफ काही पॉलिसी चेक केल्या असता त्या “पेड” मध्ये दाखवल्या जातात. मित्रांनो, याअंतर्गत आपण जर पाहिले, तर शेतकऱ्यांचा डेटा ऑनलाइन पद्धतीने पोर्टलवरती भरल्यानंतर ती पॉलिसी पेमेंट केल्यानंतर “पेड” मध्ये जाते. जर त्या पॉलिसीसाठी आपण एक रुपया पेमेंट केले नसेल, तर ते “अनपेड” मध्ये राहते.

याशिवाय जर पॉलिसीमध्ये काही त्रुटी असेल, तर पीकविमा कंपनीच्या माध्यमातून ती त्रुटी काढण्यासाठी, ती पॉलिसी जर शेतकऱ्यांनी वैयक्तिकरित्या भरली असेल, तर ती वैयक्तिक शेतकऱ्यांकडे सीएससी केंद्रामार्फत परत केली जाते. अर्थात, त्यामधील त्रुटी दूर करण्यासाठी ती पॉलिसी परत पाठवली जाते. यामधील जे काही त्रुटी असतील, त्या त्रुटी दूर केल्यानंतर पुन्हा ती पॉलिसी पीकविमा कंपनीकडे जाते. सात दिवसांत ती पोर्टलवरती तपासणी करून ती पुढे पीकविमा कंपनीकडे दिली जाते.

आता याअंतर्गत ही पॉलिसी प्राप्त झाल्यानंतर 60 दिवसांच्या कालावधीत म्हणजे दोन महिन्यांच्या आत, पीकविमा कंपनीला त्या शेतकऱ्याचे जे काही क्षेत्र त्याच्याशी सर्व मॅच होते का, हे तपासून ती पॉलिसी अप्रूव्ड करायची असते. अन्यथा ती पॉलिसी पेमेंट केल्यानंतर “पेड” मध्ये राहते. परंतु योजनेच्या कालावधी नुसार, आपण जर पाहिले तर बरेचवेळा शेतकऱ्यांना अंतिम पीकविमा भरण्याची मुदत दिली जाते, परंतु त्यापद्धतीने पीकविमा कंपनीच्या माध्यमातून कारवाई केली जात नाही.

तीन-तीन महिने, चार-चार महिने पॉलिसी तसेच “पेड” मध्ये राहतात. “पेड” मध्ये असेल म्हणजे आपली पॉलिसी त्या ठिकाणी सादर झालेली आहे, परंतु पीकविमा कंपनीच्या माध्यमातून अद्यापही तिला स्वीकारण्यात आलेले नाही. परंतु पॉलिसीवरती जी काही प्रक्रिया करायची असते, ती पुढे होऊ शकते.

आता यानंतर जेव्हा पीकविमा कंपनी यामधील कागदपत्रे तपासेल, सर्व काही डेटा तपासेल, तेव्हा ती पॉलिसी अप्रूव्ड होते. बऱ्याच जणांचा गैरसमज होतो की पॉलिसी अप्रूव्ड दाखवते म्हणजे माझा पीकविमा मंजूर झाला. पॉलिसी अप्रूव्ड झाली म्हणजे तुम्ही भरलेली पॉलिसी योग्य आहे आणि ती पॉलिसी पीकविमा कंपनीने मंजूर केलेली आहे.

यानंतर पुढील प्रक्रिया असते म्हणजे तुमचा क्लेम कॅल्क्युलेशन, क्लेम मंजूर किंवा रिजेक्ट हे सर्व. या अंतर्गत जर समजा पॉलिसी चेक करत असताना एखादे कागदपत्र चुकीचे दिसले, भरलेला पीक चुकीच्या पद्धतीने दिसला किंवा पीकविमा कंपनीच्या माध्यमातून जर फिजिकल वेरिफिकेशन झाले, अशा वेरिफिकेशनमध्ये काही समजा बोगस पीकविमा प्रकरण दिसले किंवा काही कागदपत्रे त्या त्रुटीसहित परत केली गेली असतील आणि ती सादर करण्यात आलेली नसतील तर अशा पॉलिसी रिजेक्ट देखील केल्या जातात.

पॉलिसी “पेड”, “अनपेड”, “रिवर्टेड”, “रिजेक्टेड” आणि “अप्रूव्ड” अशा वेगवेगळ्या स्टेजमध्ये असते. पॉलिसी “अप्रूव्ड” म्हणजे आपला पीकविमा जो अर्ज आहे तो मंजूर झालेला आहे. यानंतर पुढच्या जी प्रक्रिया असतात, त्यामध्ये तुमचा क्लेम दाखल केलेला आहे तो क्लेम मंजूर आहे का, तो क्लेम अप्रूव्ड का रिजेक्ट झाला आहे, याची स्थिती वेगळी आणि पॉलिसीची “पेड” आणि “अप्रूव्ड” स्थिती वेगळी असते.

याशिवाय बरेच जण विचारतात की पेड आणि अप्रूव्ड अपडेट झाला, त्यांना विमा कधी मिळणार? जे पेड आहेत त्यांचा अपडेट केव्हा होणार? पेडपासून पॉलिसी चेक करून तो अर्ज मंजूर होणं म्हणजे तुमचा पीकविमा मंजूर नाही, हा एक गैरसमज दूर करा.-Pik Vima Status Update.

हे सुद्धा वाचाएक रुपयात रब्बी पीक विमा-Rabbi Pik Vima 2024

Leave a Comment