Ration Card Maharashtra- मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व रेशनकार्डधारकांसाठी(Ration Card Maharashtra) अतिशय महत्त्वाची सूचना! केंद्र सरकारने रेशन कार्डची ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 दिलेली आहे.
जर 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुमच्या रेशन कार्डची ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर 1 नोव्हेंबरपासून तुम्हाला रेशन कार्डच्या माध्यमातून मिळणारे धान्य बंद होणार आहे. या संदर्भात महत्त्वाचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ई-केवायसी कशी करायची? हा तितकाच महत्त्वाचा प्रश्न अनेक लोकांचा आहे. असं मानलं जातं की, ई-केवायसी करण्यासाठी आधार-बेस ओटीपी च्या माध्यमातून करता येणार का? किंवा प्रत्यक्ष तहसील कार्यालय किंवा स्थानिक रेशन दुकानात जाण्याची गरज आहे का? तर ब्लॉगच्या माध्यमातून मी एक स्पष्टपणे सांगतो की, तुम्हाला ई-केवायसी करायची असेल, तर तुम्हाला एकतर तहसील कार्यालयात किंवा तुमच्या स्थानिक रेशन दुकानात जावं लागणार आहे.
अनेक लोकांनी असं म्हटलं आहे की ओटीपी बेस वर ई-केवायसी करता येते. समजा, तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती मयत झाली असेल आणि त्याची ई-केवायसी आधीच झालेली असेल. त्यानंतर पुन्हा ई-केवायसी करायची असेल, तर त्या व्यक्तीच्या नावाने मिळणारं धान्य कुटुंब घेत राहू शकतं. त्यामुळे या गोष्टीचा गैरवापर होऊ शकतो. म्हणूनच केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने ठरवलं आहे की, ई-केवायसीसाठी प्रत्यक्ष त्या दुकानात जावं लागणार आहे किंवा तहसील कार्यालयात जाऊन अंगठ्याच्या मदतीने ई-केवायसी पूर्ण करावी लागेल.
अनेक लोक असं म्हणतात की, “आम्ही शहरात राहतो, गावाकडे जाणार कसं?” किंवा “केवायसीसाठी सुट्टी मिळणार नाही.” मित्रांनो, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. ई-केवायसी केल्याशिवाय तुम्हाला रेशन धान्य मिळणार नाही. तुमचं रेशन कार्ड एक्टिव राहणार नाही, कदाचित काही दिवसांनी तुमचं रेशन कार्ड नंबर बाद होऊ शकतो किंवा तुमचं नाव कमीही होऊ शकतं. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन 31 ऑक्टोबर 2024 च्या अगोदर ई-केवायसी करणं अत्यावश्यक आहे.
जर ई-केवायसी केली नाही, तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचं नुकसान होऊ शकतं. मित्रांनो, दिवाळीत आनंदाचा सिधा देण्याची एक परंपरा आहे. महाराष्ट्र शासनाकडून गणपती, दिवाळी, दसरा या सणांना आनंदाचा सिधा दिला जातो. पण या आनंदाचा सिधा मिळवण्यासाठी एक अट ठेवली आहे—तुमच्या कुटुंबातील चार ते पाच लोकांची ई-केवायसी पूर्ण असायला हवी. अन्यथा तुम्हाला हा आनंदाचा सिधा किंवा धान्य मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला हे धान्य दिवाळी-दसऱ्याच्या निमित्ताने मिळवायचं असेल, तर 31 ऑक्टोबरच्या आधी तुमच्या तहसील कार्यालय किंवा रेशन दुकानात जाऊन ई-केवायसी पूर्ण करणं गरजेचं आहे.-Ration Card Maharashtra Update.
हे सुद्धा वाचा– तुमची पीकविमा पॉलिसी Paid की Approved?