Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana-मागेल त्याला सौर पंप पेमेंट ऑप्शन आले काय करावे?

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024- मित्रांनो, शेतकरी मागेल त्याला सौर पंप योजना(Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana) चालू झाली आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये अर्ज भरले. अर्ज भरल्यानंतर बरेच शेतकरी वाट पाहत होते की, आपल्याला लवकरात लवकर सौर पंप मिळेल कारण आता पाणी देण्याचे दिवस सुरू झालेले आहेत. कांदाला पाणी द्यावे लागत आहे, हरभऱ्याला पाणी द्यावे लागत आहे. शेतात जे काही पिक आहे, त्याला पाणी लागते. पण पाणी देण्याची लाईन वेळेवर राहत नाही किंवा डीपी जळलेली असते. अनेक प्रॉब्लेम असतात. प्रत्येक शेतकऱ्याला वाटत होते की, आपल्याला मागेल त्याला सौर पंप या योजनेमध्ये सौर पंप लागू आणि तो लवकरात लवकर मिळावा.

बर्याच शेतकऱ्यांनी अर्ज केले आणि मित्रांनो, कालपासून त्या शेतकऱ्यांचे सुद्धा ऑप्शन आलेले आहेत. आता ऑप्शन आले की पेमेंट करावे का नाही, या बद्दल आपण माहिती बघणार आहोत. कारण मित्रांनो, यामध्ये झाले आहे काय की काही शेतकऱ्यांनी काल, म्हणजे 29 तारखेला ऑनलाइन अर्ज केला आणि लगेच त्या शेतकऱ्याला पेमेंट ऑप्शन आले आहे. बरेच शेतकरी याआधीच आलेले आहेत.

पण ज्यांनी काल अर्ज भरलेला आहे त्यांनाही पेमेंट ऑप्शन आले आहे. मग याला कालच अर्ज भरला आणि लगेच पेमेंट ऑप्शन आले. यामुळे थोडा शंका येतो. पेमेंट करावे का नाही? जर पोर्टलवर तो आयडी टाकला, एमके आयडी, बेनिफिशियरी आयडी टाकला की लगेच पेमेंट ऑप्शन येते. मग या ऑप्शनमुळे बरेच शेतकरी अडचणीत आहेत कारण ही रक्कम काही छोटी नाही. कारण जवळपास जर तीन एचपीचा पंपाचा पेमेंट करायचे तर ते 22,000 रुपये पर्यंत आहे आणि पाच एचपीचा असेल तर त्याचे 32 ते 33 हजार एवढे पेमेंट आहे.

mukhyamantri saur krushi pump yojana

मग मागच्या कुसुम योजनेमध्ये बरेच शेतकरी या योजनेमध्ये फसले होते कारण पेमेंट केल्यावर ती रक्कम कंपनीकडे पोहोचली नाही. मग शेतकरी फसले. आता सुद्धा सर्वांना हे पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत. मग हे खरे आहेत का खोटे आहेत? पेमेंट करायला पाहिजे का नाही, अशी अडचण आहे.

मित्रांनो, तुम्हाला जर या योजनेची सविस्तर आणि पूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपल्याअगोदर या चैनलला सब्सक्राइब करून घ्या कारण आपण या चैनलच्या माध्यमातून अधिकृत माहिती जी असेल तीच देण्याचा प्रयत्न करत असतो. मग मित्रांनो, आता हे सर्वांना मेसेज आले की, स्टेटस चेक केल्यानंतर जे मेसेज दिसतो की पेमेंट करा म्हणून, मग हे पेमेंट करावे का नाही, याबद्दल सविस्तर महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत चौकशी केली. त्यांना विचारल्यावर त्यांनी सुद्धा सांगितले की, यामध्ये अजून काही पक्के नाही आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांना असे मेसेज आलेले आहेत की, आपला अर्ज महावितरणकडे वर्ग करण्यात आलेला आहे.

पेमेंट पर्याय पाहण्यासाठी- येथे क्लिक करा

मग त्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या तरी तुम्ही कोणतेही पेमेंट करू नका. एक-दोन-तीन दिवस थांबा. आम्ही ती पूर्ण शहानिशा करून चौकशी केल्यानंतर आपल्याला सूचित करू. असे त्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोणीही गडबड करू नका.

सध्या तरी कोणीही पेमेंट करू नका कारण एका वेळेस ही रक्कम काही छोटी नाही आहे आणि शेतकऱ्यांनी परवडणारी एवढी मोठी रक्कम नाही. कारण तीन एचपीसाठी जवळपास 23,000 रुपये आणि पाच एचपीसाठी 32 ते 33 हजार रुपये हे पेमेंट करावे लागते. त्यामुळे सध्या कोणीही पेमेंट करू नका.-Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana Update-2024.

हे सुद्धा वाचाअतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपास सचिवांची मंजुरी-2024

Leave a Comment