Kusum Yojana- नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे यासाठी राज्य शासनामार्फत 90 ते 95% अनुदान सोलर पंप दिले जात आहेत, आणि यासाठी राज्यामध्ये “मागेल त्याला सौर कृषी पंप” ही योजना राबवली जाते. मित्रांनो, याच योजने संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, केंद्र शासनामार्फत देशाच्या पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजना ही योजना राबवली जात आहे.
मोठ्या प्रमाणात या अंतर्गत उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, ज्या शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे यासाठी सोलर पंप दिले जात आहेत. याच्या अंतर्गत प्रत्येक राज्याला मागणीनुसार सोलर पंपांचा कोटा हा केंद्र शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जात आहे. 30% अनुदान दिले जाते. मित्रांनो, याचा उर्वरित खर्च हा राज्य शासनाच्या माध्यमातून केला जात आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात सोलर पंप लावले जात आहेत आणि देशभर या योजनेची अंमलबजावणी केली जात असताना महाराष्ट्र आघाडीवर आहे. जवळजवळ दीड लाखांच्या आसपास सोलर पंप या योजने अंतर्गत आतापर्यंत स्थापित करण्यात आलेले आहेत.
मित्रांनो, अशा प्रकारे या योजनेची परिस्थिती सुरू असताना राज्य शासनामार्फत पुढील तीन वर्षांत जवळजवळ 8 लाख सोलर पंप उभारणीचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. या अंतर्गत आता राज्यामध्ये प्रक्रिया सुरू आहे. यासाठी “मागेल त्याला सौर कृषी पंप” योजना सुरू करण्यात आलेली आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर या अंतर्गत अर्ज करून जे लाभार्थी प्राधान्यक्रम पात्र होतील, अशा लाभार्थ्यांना या अंतर्गत पात्र करून लाभ दिले जातील.
Kusum Yojana- सौर कृषी पंप योजनेची नोंदणी करण्यासाठी लिंक
जर आपण योजना पाहिली तर, मूळ योजना ही कुसुम सोलर पंप योजना आहे. या अंतर्गत राज्यातील इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणजेच या योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा मेडा (Meda) होती. मेडा मार्फत या अंतर्गत एक लाख सोलर पंपांचा टप्पा राबवला गेला होता. यानंतर ही योजना आता महावितरणकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे. इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणून महावितरणची निवड करण्यात आली आहे. परंतु, लाखो शेतकऱ्यांनी मेडा कडे नोंदणी केलेली होती. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी “मागेल त्याला सौर कृषी पंप” योजनेचे पोर्टल सुरू झालेले आहे.
याच्या माध्यमातून नोंदणी सुरू करण्यात आली आहे. आता जुन्या अर्जांचे काय होणार? जुने अर्ज या योजनेंतर्गत घेतले जाणार का, याबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती. मित्रांनो, या पूर्वी सुद्धा आपण एका जीआरच्या माध्यमातून माहिती दिलेली होती की, मेडाकडे असलेले अर्ज आणि महावितरण अर्ज हे दोन्ही पोर्टल्स एकत्र करून ही योजना ज्या एजन्सीद्वारे, म्हणजे महावितरणच्या माध्यमातून राबवली जात आहे. सर्व शेतकऱ्यांना महावितरणमार्फत या योजनेचा लाभ दिला जाईल. आता या योजनेला नवीन पोर्टल आणि नवीन नाव देऊन “मागेल त्याला सौर कृषी पंप” योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी एक पोर्टल सुरू करण्यात आले आहे. अर्ज भरले जात असताना, शेतकऱ्यांनी मेडाला अर्ज केले होते, तेच आधार कार्ड वापरून सुद्धा या अंतर्गत अर्ज करता येतील. नवीन योजना सुरू झाल्यामुळे नव्याने पंप दिले जात आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे.
मेडाकडे केलेली नोंदणी हीच तुमची नोंदणी आहे. ती नोंदणी ऑटोमॅटिक महावितरणकडे हस्तांतरित होणार आहे. ती प्रक्रिया आता सुरू देखील झालेली आहे. त्यामुळे, मोठ्या प्रमाणात ज्या शेतकऱ्यांनी मेडाकडे अर्ज केलेले होते, ज्यांचे अर्ज अद्याप पात्र झालेले नव्हते, अशा शेतकऱ्यांचे अर्ज महावितरणकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. आता योजना “मागेल त्याला सौर कृषी पंप” योजना सुरू झाल्यामुळे ते अर्ज नव्या पोर्टलवर उपलब्ध झालेले आहेत.
पोर्टल एकत्रीकरण करून पूर्ण अर्ज आता एकत्र करण्यात आलेले आहेत. यामध्ये बरेच लाभार्थी पुन्हा एकदा आधार कार्ड वापरून डबल अर्ज भरत आहेत. बरेच जणांचे डुप्लिकेट अर्ज झालेले आहेत. आपण या पूर्वी सुद्धा सांगितले होते की, एकच मोबाईल नंबर वापरून एकाच आधारवरती वेगवेगळ्या नोंदण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे अर्ज तसेच पडून राहतात किंवा अर्ज पात्र होण्याच्या प्रक्रियेत अडचणी येतात. हे अर्ज त्रुटीमुळे प्रक्रिया मध्येच अडकतात. जर तुम्ही मेडामध्ये नोंदणी केलेली असेल, तर नवीन नोंदणी करू नका. कारण मेडाची नोंदणी तुम्हाला पुढे इथे कामी येणार आहे.
बहुदा तुमचा मेडा अर्ज असेल, तर तुम्हाला मेसेज देखील आलेला असेल की तुमचा अर्ज हा महावितरणकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे. कारण आता पुढे लागणाऱ्या पंपांची जी काही प्रक्रिया असेल, ती पूर्णपणे महावितरणच्या माध्यमातून सोलर पंप स्थापित करून केली जाणार आहे. आपण पाहिले की राज्यात पावसाचा दिवस चालू असतो. तीन-चार महिने या कालावधीत इंस्टॉलेशन केले जात नाही. परंतु, ऑक्टोबरच्या मध्यावधीत जर अतिवृष्टी झाली नाही किंवा परतीच्या पावसाने काही बाधा निर्माण केली नाही, तर पुन्हा एकदा या मध्यावधीत सोलर पंपांच्या इंस्टॉलेशनची प्रक्रिया सुरू होईल. अन्यथा दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या अंतर्गत सोलर पंप स्थापित केले जातील. ज्यांचे पेमेंट झालेले आहे, ज्यांचा सेल्फ सर्व्हे वगैरे झाला आहे, ते सर्व शेतकरी आघाडीवर असतील.
राज्याने लवकरच एक नवा इतिहास सुद्धा घडवण्याचा चान्स आहे. कारण मोठ्या प्रमाणात कोटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. आतापर्यंत कुसुम सोलर पंप योजने अंतर्गत 55,000 पंप राज्याला उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पुढच्या वर्षी कोटा आल्यावर जवळजवळ 8 लाख पंप उपलब्ध होणार आहेत. अशा मोठ्या प्रमाणात जर याची उभारणी केली तर शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल.
हे सुद्धा वाचा– सोयाबीन कापूस अनुदान अपडेट-2024