मागेल त्याला सौर पंप payment आणि vendor selection-Solar Pump Yojana

Solar Pump Yojana 2024: मागील “त्याला सौर पंप योजनेमध्ये”(Solar Pump Yojana) ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते, त्या शेतकऱ्यांसाठी वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आलेला आहे. म्हणजे, ज्यांनी अगोदर पेमेंट केलं, त्या शेतकऱ्यांना आता कंपनी निवडता येणार आहे.

मग आता त्यामध्ये कंपनी कशी निवडायची? आपल्याला चांगली कोणती कंपनी आहे? आणि महत्त्वाचं, मित्रांनो, या कंपन्यांना काही टार्गेट दिलेलं असतं. त्या कंपन्या, अगोदर ज्या काही चांगल्या कंपन्या असतात, ते शेतकरी लवकरात लवकर निवडून घेतात. मागील “त्याला सौर पंप योजनेमध्ये” ज्या-ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते, त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तीही महत्त्वाची अशी आहे की, ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरले, अर्ज भरल्याच्या नंतर त्यांना पेमेंटचा ऑप्शन आला.

आता काही शेतकऱ्यांनी स्टेटस चेक केलं आणि त्यांना पेमेंटचा ऑप्शन आला. काही शेतकऱ्यांना त्यानंतर मेसेज आला की, “आपला हा पंप मंजूर झालेला आहे. तुमचा हा रजिस्ट्रेशन आयडी आहे आणि त्या रजिस्ट्रेशन आयडीवर आपण एवढं-एवढं पेमेंट करावं.”

आता त्यामध्ये तीन एचपी असेल, तर त्यांना ₹22,000 ते ₹23,000 च्या दरम्यान आलं होतं. ज्यांचा पाच एचपी असेल, त्यांना ₹32,000 ते ₹33,000 रुपयांच्या दरम्यान आलं होतं.

आता, ज्यांनी पेमेंट केलं होतं, त्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. ते शेतकरी वाट बघत होते की, आपल्याला वेंडर सिलेक्शन कधी येणार? आणि त्याही महत्त्वाचं म्हणजे, बऱ्याच शेतकऱ्यांना आणखी प्रश्न पडले आहेत सामायिक क्षेत्राबाबत किंवा आपल्याला विहिरीवर वीज आहे. मग या विजेचं जर कनेक्शन असेल, तर मागील “त्याला सौर पंप योजनेमध्ये” पैसे भरावेत का? त्यासंबंधीची आपण सर्व माहिती यापुढे बघणार आहोत.

मागील “त्याला सौर पंप योजनेमध्ये”(Solar Pump Yojana) इतके भयानक अर्ज भरले होते की, जालना जिल्हा नंबर एक वर होता. बीड जिल्हा नंबर दोनवर होता कारण गरजही तशीच होती. कारण नेमकं पाणी द्यायचा सीजन असतो आणि अशा वेळेस ही वीज टिकत नाही किंवा शेताला पाणी देणं गरजेचं असतं. म्हणून शेतकऱ्यांना, प्रत्येक शेतकऱ्याला वाटू लागलं की, आपल्या शेतामध्ये सोलर पंप असला पाहिजे. कारण शेजाऱ्याच्या, कोणीतरी गावातल्या शेतकऱ्याकडे सौर पंप होता. तो सौर पंपाद्वारे दिवसा पाणी देत होता. त्याला विजेची गरज नव्हती. रात्री परेशान होण्याची गरज नव्हती. म्हणून त्या शेतकऱ्याचं मस्त चाललं होतं.

मग बऱ्याच शेतकऱ्यांना दुसऱ्याही वाटत होतं. आता याही शेतकऱ्यांनी या अगोदर अर्ज भरले असतील. मात्र, त्यांना पेमेंटचा ऑप्शन आला नसेल किंवा काही शेतकऱ्यांनी अर्जच भरले नाही किंवा याचं काय खरं आहे? हे भरल्याच्या नंतर आपल्याला मिळेल का नाही? मग पैसेच आपले जातील का? अशाही बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होतं.

म्हणून आता बऱ्याच शेतकऱ्यांना हे सौर पंप मिळाले. मग मागील “त्याला सौर पंप योजनेमध्ये” भरपूर प्रमाणात अर्ज भरण्यात आले. आता भरपूर प्रमाणात भरल्याच्या नंतरही, ज्यावेळेस स्टेटस चेक केलं, त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांना पेमेंटचं ऑप्शन आलं आणि आणखीही बऱ्याच शेतकऱ्यांनी ते पेमेंट केलेलं नाही.

मात्र, आता कोणत्या शेतकऱ्यांना हा सौर पंप मिळणार आहे? तर ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केलं, अशा शेतकऱ्यांना हा सौर पंप मिळणार आहे. आता काय झालं होतं की, मागच्या “कुसुम” च्या योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना एसएमएस आले होते की, पेमेंट भरा. आणि त्यांचे भरलेले पैसे वाया गेले होते. म्हणजे त्यांनी ती वेबसाईट ही अधिकृत नव्हती. त्यामध्ये काहीतरी चुकीचा प्रोग्राम होता आणि त्या शेतकऱ्यांचे बऱ्याच त्यावेळेस पैसे वाया गेले होते. म्हणून शेतकऱ्यांना भीती सुद्धा वाटत होती की, हे पेमेंट करावं का नाही.

ज्या शेतकऱ्यांनी अगोदर पेमेंट केले, त्यांना आता वेंडर सिलेक्शन(Vendor Selection) साठी पुढची प्रक्रिया करता येणार आहे. म्हणजे ती कंपनी निवडता येणार आहे. त्यांना ज्या कंपनीचा सौर पंप घ्यायचा आहे, ती कंपनी आता त्या शेतकऱ्यांना निवडता येणार आहे.

आता, ज्याज्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत, त्या शेतकऱ्यांनी आपलं स्टेटस चेक करून घ्यावं. स्टेटस चेक केल्याच्या नंतर जर आपल्याला वेंडर सिलेक्शन आलेलं असेल, आता ते सर्वच शेतकऱ्यांना आलंय असं सुद्धा नाही. काही शेतकऱ्यांना आलेलं आहे.

ज्यांनी अगोदर पैसे भरले, तर त्या शेतकऱ्यांनी आता आपलं वेंडर सिलेक्शन आपल्याला जो काही चांगला पंप वाटतो, आपल्या शेजारी-पाजारी ज्या शेतकऱ्यांकडे पंप आहे, त्या पंपाला कोणतीही अडचण येत नाही, चांगलं पाणी येतंय, चांगल्या पाईपलाईनवर पाणी मारतो, असा सौर पंप आपण शेतकऱ्यांशी चर्चा करून चांगल्या कंपनीचा निवडावा.

आता ते वेंडर सिलेक्शन सुरू झालेलं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी आणखीही पेमेंट केलेलं नसेल, तर त्या शेतकऱ्यांनी सुद्धा आपलं पेमेंट करून घ्यायचं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आलेला नसेल पेमेंटचा, त्या शेतकऱ्यांनी आपलं स्टेटस चेक करायचं. त्यामध्ये आपल्याला त्या वेबसाईटवर सरळ सरळ तीन ऑप्शन असतात – अप्लिकेशन स्टेटस, पेमेंट्स, आणि वेंडर सिलेक्शन.

तर आता, ज्यांना पेमेंट केलेलं आहे, ज्या शेतकऱ्यांनी, त्यांना वेंडर सिलेक्शन चालू झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केले नसेल, त्यांनी स्टेटस चेक करून पेमेंट करायचं आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ज्या शेतकऱ्यांनी आणखीही अर्ज भरलेला नाही, त्या शेतकऱ्यांनी आपला अर्ज भरून घ्यायचा आहे.

त्यामध्ये काही सामायिक क्षेत्राच्या ज्या अडचणी आहेत, तर समजा एखाद्या क्षेत्रामध्ये चौघा जणांचं सामायिक क्षेत्र असेल आणि त्यामध्ये एका जणाला सौर पंप घ्यायचा असेल, तर बाकीच्या तीन जणांची २०० च्या बॉन्डवर आपण शपथपत्र घ्यायची, की “आमची यांना सौर पंप घेण्यास कोणतीही हरकत नाही.”

ते अपलोड करणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एक दुसरी गोष्ट, कास्टसाठी. तर ज्यांना कास्टमध्ये अर्ज भरायचा आहे, त्यांना फक्त पाच टक्के रक्कम भरावी लागणार आहे. त्या शेतकऱ्यांनी आपलं जात प्रमाणपत्र तिथे अपलोड करणं बंधनकारक आहे.

आता महत्त्वाची जी आनंदाची गोष्ट आहे, की बरेच शेतकरी वाट बघत होते की, आपल्याला वेंडर सिलेक्शन कधी येणार? तर आता वेंडर सिलेक्शन आलेलं आहे.

आपण लवकरात लवकर वेंडर सिलेक्शन करून घ्या. वेंडर सिलेक्शन झाल्याच्यानंतर आपलं महावितरण कडून सेल्फ सर्वे होऊन जाईल. म्हणजे सेल्फ सर्वे केल्या जाईल आणि त्यानंतर आपल्याला सौर पंप मिळणार आहे.-Solar Pump Yojana Update 2024.

हे सुद्धा वाचानिकष बदलणार का ?-Ladki bahin yojana 2024

Leave a Comment