Bhavantar Yojana 2024: मित्रांनो, खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून भावांतर योजना(Bhavantar Yojana) राबवण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये कापूस आणि सोयाबीन या उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली होती. जवळजवळ 2400 कोटी रुपयांचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेलं होतं.
सामायिक क्षेत्र असलेले शेतकरी या लाभापासून अद्यापही वंचित होते. याचबरोबर, ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर सोयाबीन-कापूस पिकाची नोंद आहे, परंतु त्या शेतकऱ्यांची ईपी पाहण्याच्या पोर्टलला नोंद नाही, असे शेतकरी देखील या अनुदानापासून वंचित राहिले होते. याच शेतकऱ्यांचा समावेश करण्याच्या संदर्भातील एक जीआर, एक पत्रक देखील मध्यंतरी निर्गमित करण्यात आलेलं होतं.
याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि याची जी काही प्रक्रिया आहे, ती पूर्णपणे ठप्प झालेली होती. आणि मित्रांनो, हीच प्रक्रिया आता पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर कापूस आणि सोयाबीन या पिकाची नोंद आहे, परंतु त्यांच्या ईपी यादीमध्ये नाव आलेलं नाही.
अशा शेतकऱ्यांची माहिती आता तलाठ्याच्या माध्यमातून संकलित केली जाईल. त्यांच्या सातबाऱ्यावर किती क्षेत्रावर सोयाबीन आणि कापूस पिकाची नोंद लागलेली आहे, अशा शेतकऱ्यांची माहिती संकलित करून कृषी विभागाला दिली जाईल. आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या लॉगिनवरून ही एससी ऍग्री डीबीटीचं जे पोर्टल आहे, त्या पोर्टलवर ती माहिती संकलित केली जाईल. ती माहिती जमा केली जाणार आहे.
याचबरोबर, वनपट्टा धारक शेतकऱ्यांना देखील दिलासा देण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला होता, ज्याच्यामध्ये वनपट्टा धारक शेतकऱ्याचं नाव, त्याची माहिती, त्याच्या क्षेत्रावर असलेल्या सोयाबीन आणि कापूस पिकाची लागवड, या सर्वांबद्दलची माहिती संकलित करून ती माहिती देखील अपलोड करण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले होते. याचबरोबर, चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यामधील जे लँड रेकॉर्ड आहे, ते अद्यावत डिजिटाइज न झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना देखील या योजनेमधून लाभापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं.
त्या शेतकऱ्यांची माहिती देखील संकलित करण्याचे निर्देश ऑलरेडी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले होते. आणि याच्या अंतर्गत हे जे काही शेतकरी असतील, ज्यांच्या सातबारावर नोंदी आहेत, परंतु ईपी पाण्याच्या पोर्टलला नावं नव्हती, असे शेतकरी, वनपट्टा धारक शेतकरी, याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील शेतकरी, या सर्व शेतकऱ्यांची माहिती संकलित करून पोर्टलवरती अपडेट करण्यासाठी 13 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.
तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या लॉगिनमधून ही माहिती आता त्याठिकाणी अपलोड केली जाईल आणि पुढे या शेतकऱ्यांच्या याद्या बनवून, या शेतकऱ्यांना देखील हेक्टरी ₹5000 च्या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.-Bhavantar yojana update 2024.
हे सुद्धा वाचा– लाडक्या बहिणींना ₹२१०० कधीपासून मिळणार?-2024