Scooty Yojana 2024- नमस्कार मित्रांनो, एक गुड न्यूज आली आहे. आता लाडकी बहिन योजनेप्रमाणे महिलांना स्कूटी देखील मोफत देण्यात येणार असल्याची माहिती सध्या चर्चेत आहे. नेमकी ही योजना कोणाला लागू होणार, यासाठी काय पात्रता असणार आहे, आणि कधी चालू होणार आहे, अर्ज कसा करायचा, या सगळ्या गोष्टी या ब्लॉगच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत वाचा.
महिलांसाठी ज्या प्रमाणे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये लाडकी बहिन योजना सुरू आहे, त्याच धरतीवर आता महाराष्ट्रात देखील भाजप सरकारने लाडकी बहिन योजना सुरू केली आहे. ती चांगली यशस्वी होताना दिसत आहे. फक्त काही 10% महिलांना सोडले तर, त्यांच्या खात्यात अजून पैसे जमा झालेले नाहीत. एकही हप्ता मिळालेला नाही. त्याचे कारण कदाचित कागदपत्रांमध्ये काही अडचण असेल किंवा काही त्रुटी असतील, म्हणूनच त्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. पण आता 90% महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. सरकारकडे आता पैसे नसतील, पण ते उधार घेत आहेत किंवा कोणत्याही प्रकारे ते उभे करत आहेत.
राजस्थानमध्ये महिलांना स्कूटी देण्यात येते, त्याच धरतीवर मध्य प्रदेशमध्ये पीएम किसान स्कूटी योजना आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील ही योजना राणी लक्ष्मीबाई योजना या नावाने सुरू आहे. तसेच दक्षिण भारतात, तमिळनाडूमध्ये देखील ही योजना सुरू आहे. आता महाराष्ट्रात देखील शिंदे सरकार ही योजना राबवण्याचा विचार करत आहे.
योजनेची पात्रता अशी असणार आहे की, ज्या मुलींचे वय 17 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि त्या पदवी किंवा पदवीधर शिक्षण घेत आहेत, अशा मुलींना किंवा महिलांना ही स्कूटी दिली जाणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय किंवा अधिकृत लिंक अजून आलेली नाही. कारण दोन-तीन दिवसांपूर्वी हा विचार शासनाकडून आला आहे.
योजनेच्या अधिकृत माहितीसाठी किंवा अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती लवकरच उपलब्ध होईल. या योजनेची एक गोष्ट नक्की आहे की, लाडकी बहिन योजनेप्रमाणे सर्व महिलांना ही योजना लागू नसून, फक्त शिक्षण घेणाऱ्या मुलींना ही स्कूटी दिली जाईल. राजस्थानमध्ये इलेक्ट्रिक स्कूटी दिली जाते, तर उत्तर प्रदेशात पेट्रोलवर चालणारी स्कूटी दिली जाते. महाराष्ट्रात कोणती स्कूटी दिली जाणार, हे भविष्यात कळेल.
हे सुद्धा वाचा– 7000 गावात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना