Ladki Bahin Yojana 2024- नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीसाठी आज आनंदाची आणि खुशखबर आहे. दसरा निमित्त धडाकेबाज निर्णय आलेला आहे आणि दसरानिमित्त सर्वांना एक लाडक्या बहिनी दिलेलं वचन पूर्ती आज त्यांनी प्रत्यक्षात पहिल्या स्टेपला केलेली आहे. ती वचनपूर्ती म्हणजे काय? महाराष्ट्रातील महिलांना अर्ध वेळेत ते घरा जवळ आणि चांगल्या पद्धतीने काम उपलब्ध करून देण्याचं काम चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली होती. ते पालक मंत्री आहेत अमरावतीत, आणि त्यांनी सांगितले होते की, “महिलांसाठी मी भविष्यात ही योजना आणून तिची अंमलबजावणी करणार.”
महिलांना 8000 ते 12000 पगार उपलब्ध करून देणार, आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महिलांना स्वावलंबन करून उभं करायचं काम मी करणार, हे त्यांनी वचन त्या ठिकाणी घेतलं होतं. त्या वचनाची पूर्ती झालेली आहे. आता तुम्हाला महिन्याला तब्बल 10 ते 12 हजार रुपये मिळणार आहेत. फक्त फॉर्म भरायचं काम आहे. पण अतिशय नामांकित कंपनीमध्ये काम आहे. हे तर फक्त सुरुवात आहे, आता प्रत्येक ताईच्या गावापर्यंत ही योजना पोचणार आहे. आणि प्रत्येक ताई आपल्यापर्यंत पात्रता असेल तेवढं काम करून पैसा कमवू शकणार आहे. यामध्ये काम किती मिळणार, पगार किती मिळणार, भत्ता काय, सर्व आपण या वेळी बघणार आहोत. नेमकं ही योजना कुठे लागू झाली, आपण तेही बघणार आहोत.
महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना जशी आली, महिलांना 1500 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले. आणि खास करून ते पैसे महिलांसाठीच होते. महिला स्वतःच्या खात्यात जमा होण्यामुळे महिलांना ती मदत थेट मिळत होती. नवऱ्याला नाही, भावाला नाही, पप्पाला नाही—त्यामुळे काय झालं? महिलांना ती डायरेक्ट मदत मिळाली. त्यामुळे महिला खूप सक्षम झाल्या, आणि त्या पासून महिलांनी स्वतःचं हात चालवायला सुरुवात केली. एवढं सगळं यशस्वी झालं असताना, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, महिलांना फुकट पैसे मिळतात का अशी भावना निर्माण होऊ नये, म्हणून महिलांना सक्षम करणं हाच सरकारचा उद्देश होता.
ती योजना त्यांनी आणली होती की, गावाजवळ महिलांना काम मिळेल. कारण स्त्रियांना, बायांना काम करण्याची इच्छा खूप असते, पण काम मिळत नाही. संसार आणि सांसारिक जबाबदाऱ्या असतात, मुलं असतात, नवरा असतो, कुटुंब असतं, यामुळे स्त्रिया काम करू शकत नाहीत. त्यांना काम मिळतं नाही, पण त्या काम करायची इच्छा ठेवतात. ही सगळी समस्या आहे. महिलांसाठी हा एक निर्णयमूलक योजना आहे.
या योजनेंतर्गत टाटा कंपनीमध्ये फक्त चार तास काम करून तुम्हाला 11 ते 12 हजार रुपये महिन्याला मिळणार आहेत. म्हणजे स्त्रियांना आता एक उमेद मिळणार आहे की, ‘मी माझ्या पायावर उभं राहू शकते.’ काम करून पैसे कमवण्याचं समाधान मिळेल. त्या महिलांना काम मिळेल जेव्हा त्या घरी दुपारची वेळ असेल, एक ते चार वाजेपर्यंत.
महिलांना आता काम मिळणार आहे आणि टाटा कंपनीने त्यांच्या संपर्कात आलेल्या महिलांना काम दिलं आहे. आतापर्यंत दोन महिलांना नियुक्ती मिळाली आहे. डायरेक्टली फक्त काम आहे, एक ते चार वाजेपर्यंत. पगार 11 ते 12 हजार रुपये मिळणार आहे. आणि सोबतच दुपारचं जेवण सुद्धा कंपनीकडून दिलं जाणार आहे.
सर्व काही पीएफ, सगळी योजना लागू असतील. आणि टाटा कंपनी हजारो महिलांना काम देणार आहे. प्रत्येक कंपनी असो, प्रत्येक शासकीय कार्यालय असो, या ठिकाणी महिलांना काम उपलब्ध होणार आहे. हे महिलांसाठी खूपच महत्त्वाचं आहे.
हे सुद्धा वाचा– महिलांना मिळणार स्कूटी मोफत- Scooty Yojana 2024