Bandhkam Kamgar Yojana 2024- मित्रांनो, राज्यातील जवळजवळ 54 लाख नोंदणीकृत सक्रिय नोंद असलेले बांधकाम कामगारांचे केली जाते, आणि यासंदर्भातील एक महत्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओ च्या माध्यमातून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, एकदा आपण जर पाहिलं, तर तीन वर्षांपूर्वी तत्कालीन बांधकाम कामगार मंत्री हसन मुश्री साहेब यांच्या माध्यमातून बांधकाम असल्या बाबतची माहिती देण्यात आलेली होती.
घोषणा करण्यात आलेली होती, परंतु या बोनसची अंमलबजावणी करण्यात आलेली नव्हती, आणि याच पार्श्वभूमीवर हा विषय न्यायालयात गेला होता. न्यायालयाच्या माध्यमातून या बांधकाम कामगारांचे निर्देश(Bandhkam Kamgar Yojana 2024) देण्यात आले होते, परंतु याची अंमलबजावणी झालेली नव्हती. मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर 8 ऑक्टोबर 2024 रोजी आझाद मैदानावर बांधकाम कामगार संघटना, यांच्या माध्यमातून एक आंदोलन करण्यात आले होते, आणि या आंदोलन करताना ज्या वेळी बांधकाम कामगार मंत्री सुरेश खाडे साहेब भेटले होते, त्या वेळी सुद्धा त्यांना हेच निवेदन देण्यात आले होते.
यांची मागणी मान्य करण्यासंदर्भातील एक आश्वासन सुरेश खाडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आले होते. मित्रांनो, यानंतर 10 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीमध्ये राज्यातील सक्रिय नोंदणी असलेले जे 27 लाखांपासून बांधकाम कामगार आहेत, त्याच प्रमाणे नवीन नोंदणी केलेले, पुनर्नोंदणी केलेले, किंवा रिन्यूअल केलेले आहेत, असे जवळजवळ 25 लाख बांधकाम कामगार, एकूण 54 लाख बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस म्हणून 5000 रुपये देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. यासाठी जवळजवळ 2700 कोटी रुपयांचा निधी या बांधकाम कामगारांच्या उपकरामधून वापरण्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आलेली होती.
जीआर पाहण्यासाठी- इथे क्लिक करा
मित्रांनो, बांधकाम कामगारांच्या बांधकाम कामगारांचे नोंदणी सक्रिय आहे, आणि त्या बांधकाम कामगारांच्या खात्यावरती जी बँक खाते यासी लिंक आहे अशा आधार संलग्न बँक खात्यावरती 5000 रुपयांचा बोनस वितरण करण्यासाठी सुरुवात देखील करण्यात आली. 14 ऑक्टोबरपासून हे वितरण सुरू करण्यात आले, 15 ऑक्टोबर रोजी काही वितरण झालं, आणि आज 15 ऑक्टोबर 2024 रोजी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणुकीची आचारसंहिता जाहीर करण्यात आलेली आहे.
आता, या पार्श्वभूमीवर उर्वरित जे काही बांधकाम कामगार आहेत, त्यांना हा दिवाळी बोनस वाटप केला जाऊ शकतो का, हा देखील एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. कारण, कुठल्यातरी मतदारांना प्रलोभन दिल्याचे यामधून सिद्ध होऊ शकते. विरोधी पक्षाच्या माध्यमातून यासंदर्भात आक्षेप घेतले जाऊ शकतात, परंतु एकदा पूर्वी घेतलेले निर्णय आणि यासाठी दिलेली मंजुरी यामुळे याला विरोध करण्याचे कारण असू शकत नाही, किंवा याच्या वाटपात कुठल्याही प्रकारची समस्या येण्याचे कारण असू शकत नाही. मात्र, आता यासंदर्भात काय निर्णय घेतला जातो, हे जसे सुरू असलेले वाटप अशा प्रकारे सुरू राहते की निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे उर्वरित असलेल्या बांधकाम कामगारांचे वाटप आता कुठे तरी अडतं, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.
आता लवकरच यासंदर्भातील उकल समोर येईल, आणि बांधकाम कामगारांचे हे सुरू असलेले वाटप सुरू होईल की ते निवडणुका झाल्यानंतर डिसेंबरमध्ये वाटप केले जाईल, हे पाण्यासारखं असणार आहे. परंतु, एकदा शासनाच्या माध्यमातून थोडासा उशीर करण्यात आला कारण 10 ऑक्टोबर 2024 च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी दिल्यानंतर जर तत्काळ हे वाटप सुरू केले गेले असते, तर किमान 10 ते 15 लाख, 20 लाख लाभार्थी बांधकाम कामगारांच्या खात्यांवरती बोनस वितरित करता आला असता. आता जेवढे बांधकाम कामगारांचे दिवाळी गोड होणार आहे, मात्र ज्या बांधकाम कामगारांना आपली दिवाळी साजरी करावी लागणार आहे, त्यांना न्यायालयाच्या निकालांमुळे, पूर्वी मंत्रिमंडळ मंजुरी दिलेली असल्यामुळे पॉझिटिव्ह बाबी समोर असल्यामुळे, या बांधकाम कामगारांच्या खात्यांवर दिवाळी बोनस येऊ शकतो, आणि यावा अशी अपेक्षा आहे.
हे सुद्धा वाचा– महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची घोषणा-2024