Apaar ID Card: मित्रांनो, अपार कार्ड शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आवश्यक असलेले एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत जवळजवळ सर्वच विद्यार्थ्यांचे अपार कार्ड उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातील निर्देश देण्यात आलेले आहेत.
आणि याच पार्श्वभूमीवर, राज्यामध्ये 29 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबर रोजी एक विशेष मोहीम राबवून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार कार्ड(Apaar ID Card) उपलब्ध करून देण्यासाठी अपार कार्ड दिवस साजरा केला जाणार आहे.
मित्रांनो, विद्यार्थ्याची शालेय माहिती आणि आरोग्यविषयक माहिती ही सर्व माहिती एकत्रितपणे करण्यासाठी या अपार कार्डचा वापर केला जाणार आहे. विद्यार्थ्याचे एका शाळेतून दुसऱ्या शाळेत ट्रान्सफर असेल किंवा इतर शैक्षणिक माहिती असेल, ती एकाच ठिकाणी साठवण्यासाठी या कार्डचा उपयोग होणार आहे.
याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा वेळोवेळी माहिती घेतलेली आहे. आणि मित्रांनो, आता हीच अपार कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी विशेष मोहीम राबवली जाणार आहे, ज्यामध्ये पालकांना आपल्या पाल्याचे, म्हणजेच शालेय विद्यार्थ्याचे अपार कार्ड बनवण्यासाठी कन्सर्न द्यावे लागणार आहे.
Apaar ID Card: PDF Link
पालकांनी कन्सर्न दिल्यानंतरच शाळेच्या माध्यमातून, मुख्याध्यापकांच्या माध्यमातून, या विद्यार्थ्याचे अपार कार्ड इशू केले जाणार आहे. मित्रांनो, यासाठी लागणाऱ्या कन्सर्नचा नमुना सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. कन्सर्नच्या नमुन्याची पीडीएफ आपल्याला वरील लिंक मध्ये देण्यात आलेली आहे.
अशा प्रकारचा कन्सर्न पालकांनी द्यायचा आहे. हा कन्सर्न दिल्यानंतरच आपल्या पाल्याचे अपार कार्ड बनवले जाणार आहे.
तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे असे हे डॉक्युमेंट आपल्यापाल्यांचेही तयार व्हावे यासाठी पालकांनी कन्सर्न देण्याचा प्रयत्न करावा.-Apaar ID Card Update 2024.
हे सुद्धा वाचा– सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाची मोठी खुशखबर