अग्रिम पीकविमा 2024 अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपा-Pik Vima 2024

Pik Vima 2024: मित्रांनो, अग्रिम पीकविमा 2024 अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्यामध्ये खरीप हंगाम 2024 मध्ये विविध भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती याच्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. याच्यासाठी पीकविमा(Pik Vima) योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं, तर नांदेड, हिंगोली, यवतमाळ, आणि परभणी या चार जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पीक विम्यासाठी अधिसूचना काढण्यात आलेली होती.

याचबरोबर जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी, ज्या ज्या भागातील शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होऊन त्या जिल्ह्यासाठी जे प्रस्ताव पाठवण्यात आलेले होते, ते प्रस्ताव सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच मंजूर करण्यात आलेले होते.

ज्या जिल्ह्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले होते, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करून केवायसीची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली होती. परंतु विधानसभेच्या निवडणुका लागल्यामुळे, आचारसंहिता लागल्यामुळे या पीक विम्याच्या वाटपाची आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वाटपाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प करण्यात आलेली होती. ती आता पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या याद्या आलेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांची केवायसी सुरू झालेली आहे. अशा प्रकारे आता केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये साधारणपणे 5 डिसेंबरपासून, म्हणजे पुढील आठवड्यामध्ये, त्यांची अतिवृष्टी नुकसान भरपाईची(Ativrushti Nuksan Bharpai) रक्कम वितरित केली जाणार आहे.

याचबरोबर हिंगोली, परभणी, यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये काढण्यात आलेल्या अधिसूचनेचा पीक विमा वितरण देखील बाकी आहे. हे वितरण सुद्धा साधारणपणे पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे.

याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती. जवळजवळ 500 कोटींपेक्षा जास्त रक्कम मंजूर करण्यात आलेली होती. काही शेतकऱ्यांना या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच वितरण करण्यात आलेलं होतं. आणि त्यात झालेल्या केवायसी झालेल्या शेतकऱ्यांच्या पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा वितरित केली जाणार आहे.

मित्रांनो, परभणीचं पीक विम्याचं वितरण हे साधारणपणे 2 डिसेंबर नंतर सुरू होणार आहे. आशा करू या, इतर तीन जिल्ह्यांमध्ये सुद्धा पुढील आठवड्यामध्येच या पीक विम्याचं वितरण सुरू केलं जाईल.

याचबरोबर आपण जर पाहिलं, तर अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये आतापर्यंत वितरित करण्यात आलेल्या मंजूर करण्यात आलेल्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रक्कम होती ती म्हणजे परभणीची 500 कोटी, त्याच्यानंतर लातूर साधारणपणे 350 कोटी, आणि बाकी जिल्ह्यांमध्ये थोड्या मोठ्या प्रमाणात जे काही सुरुवातीला झालेल्या पावसामुळे नुकसानग्रस्त झालेले शेतकरी यांचा समावेश होता.

परंतु मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे बाधित झालेले जिल्हे अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ज्याच्यामध्ये नांदेड, यवतमाळ, हिंगोली, धाराशिव, सोलापूर, किंवा इतरही बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमधील प्रस्ताव हे शासनाला प्राप्त झालेले आहेत.

परंतु त्या प्रस्तावांचे जीआर अद्याप आलेले नाहीत. ते आल्यानंतर त्याची माहिती सुद्धा आपण नक्की घेऊ. परंतु आत्तापर्यंत ज्या-ज्या जिल्ह्याचे जीआर आलेले आहेत आणि ज्या-ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या केवायसीच्या याद्या आलेल्या आहेत, त्या त्या शेतकऱ्यांच्या केवायसी पूर्ण करून आता त्याच्या वितरणाच्या प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत.-Pik Vima Update 2024.

हे सुद्धा वाचाकधी होणार अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर-2024

Leave a Comment