Pik Vima 2024- नमस्कार मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मधील 25 टक्के pik vima/पीक विमा वाटपाच्या मंजुरीच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील 110 महसूल मंडळांना 25% सोयाबीन साठी pik vima/पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या माध्यमातून 30 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेली आहे.
एकंदरीत खरीप हंगाम 2024 मध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यामध्ये पूर्व विदर्भासह पश्चिम विदर्भाला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता आणि याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं.
जीआर पाहण्यासाठी– इथे क्लिक करा
याच पार्श्वभूमीवरती रॅन्डमली सर्वेक्षण करण्याचे निर्देश देऊन झालेल्या नुकसानाची तपासणी सर्वेक्षण करण्यात आलेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती यवतमाळ जिल्ह्यामधील 110 च्या 110 महसूल मंडळामध्ये सोयाबीन या पिकाचं 50% पेक्षा जास्त नुकसान दिसून आलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आतमध्ये 25% पीक विमा वाटप करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
याच्या संदर्भातील अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे, आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये ज्याच्यामध्ये हिंगोली असेल, नांदेड असेल, परभणी असेल या जिल्ह्यामध्ये देखील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विम्यासाठीच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या आणि याच पार्श्वभूमीवरती यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळावा अशा प्रकारची मोठी मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात होती.
याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून नुकसानीसाठी मोठ्या प्रमाणात क्लेम देखील दाखल करण्यात आलेले होते आणि यास्तव 17 ऑगस्ट 2020 च्या पीक विम्याच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत या गाईडलाईन्स नुसार शेतकऱ्यांना 25% पीक विमा देण अपेक्षित आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या अधिसूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून आता एक महिन्याच्या आतमध्ये पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्याला पीक विम्याचं 25% वितरण करणं आहे.
अशाप्रकारेयवतमाळ जिल्ह्याच्या पीक विम्याच्या संदर्भातील हे एक अतिशय महत्त्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपण आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो.
याचप्रमाणे इतर जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि ज्या ज्या जिल्ह्याच्या अधिसूचना निघतील किंवा जे जे अपडेट आपल्याकडे उपलब्ध होतील ते त्या ते अपडेट आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह.
हे सुद्धा वाचा– Mukhyamantri Annapurna Yojana 2024- लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत