Ativrushti Nuksan Bharpai Update 2024-सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर

Ativrushti Nuksan Bharpai Update 2024- सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई(Ativrushti Nuksan Bharpai) मंजूर. मे आणि एप्रिलमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्या मध्ये शेतकऱ्यांचे बरंच नुकसान झालं होतं. मे-एप्रिल 2024 मध्ये याम नदी-नाले फुटले होते, मोठ्या ज्या काही नद्या आहेत त्या सुद्धा फुटल्या होत्या. यामध्ये शेतकऱ्यांचे बरेच शेतीचे नुकसान झालं होतं. त्या मध्ये सोयाबीन पीक असेल, भुईमूग असेल, हळद असेल, भात असेल, अशा पिकांचे नुकसान झालं होतं. कृष्णा-वारणा या नद्यांना पूर आला होता. अशा पूर परिस्थितीत शेतकऱ्यांचे पीक वाहून गेलं होतं. आणि या वाहून गेलेल्या पिकांचं शेतकऱ्यांचे त्या वेळेस पंचनामे करण्यात आले. पंचनामे करून ते वरिष्ठ विभागाकडे, महा मदत पुनर्वसन विभागाकडे पाठवले गेले, आणि विभागीय आयुक्तालयाकडे मागणी करण्यात आली.

आता हे नुकसान सांगली जिल्ह्यात झालं होतं. सांगली जिल्ह्यात शिराळा, पलूस, मिरज आणि वाळवा तालुका यामध्ये शेतकऱ्यांचे बरंच नुकसान झालं होतं. यामध्ये 1925 शेतकऱ्यांचे शेतीत पीकाचे नुकसान झालं होतं. त्या मध्ये सोयाबीन होतं, कापूस होतं, त्यानंतर हळद पीक होतं, भात पीक होतं, भुईमूग होतं. असे हे शेतकऱ्यांचे नुकसान झालं होतं, आणि या नुकसानी पोटी 6784 हेक्टर जमिनीचे नुकसान झालं होतं.

या सर्व जमिनीचे पंचनामे करण्यात आले, आणि पंचनामे करून मग ते जिल्हा अधिकाऱ्यामार्फत विभागीय आयुक्त पुनर्वसन विभागाकडे त्या संबंधी मागणी केली. आता मागणी केल्यानंतर नेमकी शेतकऱ्यांना किती मदत जाहीर झाली आहे आणि शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे या संबंधी माहिती आपण आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

जी मदत मिळणार आहे ती सांगली जिल्ह्यात आहे. हे काही नुकसान एप्रिल किंवा जून मध्ये झालं नव्हतं, तर हे सलग मे, एप्रिल, जून आणि जुलै पर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान होत राहिलं. आणि दोन-तीन वेळेस ज्या नुकसानी झाल्या त्यांचे पंचनामे करण्यात आले.

त्या मध्ये सर्वच पिकांचे नुकसान झालं होतं. कारण दृष्टी एवढी झाली होती की दर वर्षीपेक्षा पाऊस या वर्षी इतका भयानक पडला की नदी-नाले एकत्र झाले. शेतात माती सुद्धा काही भागात वाहून गेली, पिकं नेस्तनाबूत झाली, पिकं सुद्धा भुईसपाट झाली. आणि मग या वेळेस जेव्हा पंचनामे करण्यात आले तेव्हा शासनाकडे या मदतीची मागणी करण्यात आली. मात्र जितकी मागणी करण्यात आली तितकी मदत शासनाकडून मिळालेली नाही.

आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असेल, त्यांच्या माध्यमातून सुद्धा मदत मिळायला हवी होती. आणि जे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाची मदत असते ती सुद्धा आतापर्यंत मिळायला पाहिजे होती. मात्र, आता ऑक्टोबर उजाडला आहे, दिवाळी चालू आहे, आणि आता ही मदत शेतकऱ्यांना मिळालेली आहे. ती मदत म्हणजे 12 कोटी 39 लाख 93 हजार रुपये सांगली जिल्ह्यातील शिराळा, पलूस, मिरज आणि वाळवा या तालुक्यात जे नुकसान झालं होतं त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही मदत लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

त्यासाठी फक्त ज्या शेतकऱ्यांचे खाते लिंक आहे, त्या खात्याचा चेक करावा. त्यात ही रक्कम मिळणार आहे. ज्यांनी शेतकऱ्यांनी आपलं आधार खाते लिंक करून घेतलं आहे त्यांना मदत मिळेल. मित्रांनो, जर आपण पीक विमा भरताना एखाद्या दुसऱ्या बँकेचं खाते दिलं असेल आणि ते तुमच्या आधारशी लिंक नसेल, तर तुमची मदत त्या खात्यात जमा होणार नाही. अशा ज्या नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी दिवाळीची ही आनंदाची भेट ठरणार आहे.-Ativrushti Nuksan Bharpai Update 2024.

हे सुद्धा वाचाआता प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प ची गरज नाही

Leave a Comment