Ayushman Bharat Card 2024- मित्रांनो, आपण अशा योजनेची माहिती घेणार आहोत आणि ती अत्यंत महत्वाची योजना आहे, कारण प्रत्येक कुटुंबात ज्येष्ठ नागरिक असतात ज्यांचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त असू शकते किंवा कमीही असू शकते. ही एक आरोग्यविषयक योजना आहे.
तुम्ही तर बघत असाल की आजकाल हॉस्पिटलमध्ये गेले की कोणतेही साधे दुखणे असले तरी किती पैसे लागतात. मग एखादे ऑपरेशन करायचे म्हटले तर त्याला लाख-दोन लाख, तीन लाख, चार लाख किंवा पाच लाख सुद्धा लागू शकतात. त्यामुळे शासनाने अशी एक योजना आणलेली आहे, आणि त्या योजनेबद्दल आपण माहिती घेणार आहोत.
त्या योजनेचे नाव आहे ‘आयुष्मान भारत निरामय योजना'(Ayushman Bharat Card Yojana). या आयुष्यमान भारत निरामय योजनेतून नेमके कोणाला कोणाला उपचार मिळणार, त्यामध्ये किती सुविधा मिळणार, उत्पन्नाची काय अट असणार या सर्व गोष्टींवर आपण आज प्रकाश टाकणार आहोत.
आयुष्मान भारत निरामय आरोग्य योजना, या योजनेचा माध्यमातून ज्या कुटुंबातील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय 70 किंवा 70 पेक्षा जास्त आहे, अशा ज्येष्ठांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत विमा आणि मोफत उपचार मिळणार आहे. ही योजना आहे. याआधी आयुष्मान भारतच्या माध्यमातून सर्वच पात्र कुटुंबांना लाभ मिळत होता, मात्र त्यात उत्पन्नाची अट होती.
कार्डसाठी अर्ज करण्यासाठी आणि कार्ड डाउनलोड करण्यासाठी– येथे क्लिक करा
आता ही जी आयुष्यमान भारत निरामय योजना आहे, या योजनेत तुमचे उत्पन्न कितीही असो – जास्त असो किंवा कमी असो, उत्पन्नाची कोणतीही अट राहिलेली नाही. म्हणजेच, ज्येष्ठ नागरिक जे 70 किंवा 70 पेक्षा जास्त वयाचे असतील, त्यांना या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.
या योजनेसाठी उत्पन्नाची अट नाही, आणि हे कार्ड काढण्यासाठी आपल्याला पीएम-जेएवायच्या वेबसाइटवर जाऊन आधार कार्डच्या माध्यमातून याची नोंदणी करायची आहे.
या योजनेचा फायदा देशातील साडेतीन कोटी कुटुंबांतील सहा कोटी ज्येष्ठांना होणार आहे. आज जवळपास सहा कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त आहे किंवा 70 वर्ष आहे, अशा वृद्धांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.-Ayushman Bharat Card Yojana Update 2024.
हे सुद्धा वाचा– मागेल त्याला सौर पंप पेमेंट ऑप्शन आले काय करावे?-Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2024