Bhavantar Yojana 2024- मित्रांनो, राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण आता पार पडलेले आहे. निवडणुकीपूर्वी आपण पाहिलं होतं की, एक रणकंदन माजलं होतं. शेतमालांचे हमीभाव, सोयाबीनला सहा हजार रुपयांचा एमएसपी दिला जाणार, याच्याबरोबर आपण पाहिलं होतं की वेगवेगळ्या मोठ्या घोषणाही करण्यात आल्या होत्या, जसे की कर्जमाफी वगैरे.
यासर्वांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेला जात होता तो म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळत नसलेला भाव. विदर्भ आणि मराठवाड्यामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी हे मोठ्या प्रमाणात नाराज होते.
या नाराजीचा फटका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बसणार, हे जवळजवळ निश्चित होते. तशा प्रकारे शेतकऱ्यांच्या जे काही स्टेटमेंट्स सुद्धा येत होती. या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं होतं की, 4892 हमीभाव करणं असेल किंवा इतर काही, शासनाच्या माध्यमातून काही पावलं उचलण्यात आली होती. त्यामध्ये आद्रता 12% वरून 15% करण्यात आली होती.
परंतु, या व्यतिरिक्त शेतकऱ्यांची जी महत्त्वाची मागणी होती ती म्हणजे सहा हजार रुपये सोयाबीनला हमीभावाची. सहा हजार रुपये सोयाबीनला हमीभाव करणार, असे पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून सांगण्यात आले. त्यानंतर अमित शहा यांच्या माध्यमातून जाहीरनाम्यात सांगण्यात आलं.
आता निवडणुका झालेल्या आहेत. एक्झिट पोल येत आहेत. बऱ्याच माध्यमांतून एक पोल घेतला होता. जवळजवळ 20 हजार लोकांनी कमेंट्स केल्या होत्या. त्यामध्ये काही आकडेवारी सांगण्यात आली की, एकंदरीत त्रिशंकू विधानसभेची शक्यता आहे.
हे महाराष्ट्रातील चित्र आहे, आणि हे चित्र उद्या जवळजवळ स्पष्ट होईल. परंतु, हे स्पष्ट होत असतानाच दुसऱ्या बाजूला काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून 25 नोव्हेंबरपासून, म्हणजे सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.
या हिवाळी अधिवेशनामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा घेतला जाणार आहे, तो म्हणजे शेतमालाच्या हमीभावाचा. मोठ्या प्रमाणावर आंदोलन मध्यप्रदेशामध्ये झालेले आहे. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी एमएसपी किंवा 6000 रुपये सोयाबीनचा हमीभाव, कापसाचा भाव किंवा भावांतर योजना, या विषयांवर चर्चा होईल.
याचबरोबर आपण पाहिलं होतं की, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी कांद्याचा भाव मोठ्या प्रमाणात ढासळलेला होता. या पार्श्वभूमीवर कांदा, टमाटर यांचे भाव स्थिर ठेवण्यासाठी महत्त्वाची विधेयके किंवा चर्चा हिवाळी अधिवेशनामध्ये होण्याची शक्यता आहे. सोयाबीनच्या भावाच्या संदर्भात दिलासादायक निर्णय हिवाळी अधिवेशनामध्ये घेतला जाईल.
अशाप्रकारच्या अपडेट्स समोर येत आहेत. याचबरोबर ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकही मांडले जाणार आहे. परंतु, आता हे सर्व होत असताना एक मोठं संकट त्यावर आलेलं आहे, ते म्हणजे अदानी प्रकरण. आपण पाहिलं आहे की, वेळोवेळी कुठलातरी विषय येतो आणि अदानी-अंबानी यांच्यावर चर्चा सुरू होते. परिणामी, सर्वसामान्यांचे विषय मागे राहतात.
सध्या, अमेरिकेने अदानी यांचे मोठ्या प्रमाणातील ऑर्डर्स कॅन्सल केल्यात. भारतात राहुल गांधी यांनी अदानीविरोधात आवाज उठवला आहे. जर हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा चर्चेला आला, आणि यामुळे कामकाज बंद झाले, तर सोयाबीनच्या हमीभावाचा किंवा भावांतर योजनेचा विषय कुठेतरी दबून राहील.
सध्या, उद्याचे निकाल आणि त्यानंतर सरकारची स्थिती ठरवेल की, पुढील हालचाली कशा होणार. परंतु, या हिवाळी अधिवेशनामध्ये केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी 6000 रुपयांचा सोयाबीन हमीभाव, कापसाचा भाव आणि कांद्याच्या भावाचा मुद्दा मिटवावा, हीच अपेक्षा आहे.-Bhavantar Yojana Update 2024.
हे सुद्धा वाचा– सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र शासनाचा मोठा दिलासा-2024