Bima Sakhi Yojana- कोणत्या महिलांना मिळणार लाभ आणि योजनेत सहभगात कसा घ्यायचा?

Bima Sakhi Yojana 2024: लाडक्या बहीण योजनेवरून सगळीकडे चर्चा सुरू आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेतून महिलांना महिन्याला 7000 रुपये मिळणार आहे.

विशेष म्हणजे देशातील 18 ते 70 वर्ष वयोगटातील महिला या योजनेत सहभागी होऊ शकतील. या योजनेतून महिलांना आर्थिक साक्षर करून कायमस्वरूपी आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा उद्देश आहे.

बिमा सखी योजना(Bima Sakhi Yojana) देश पातळीवर राबवली जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी हरियाणातील पानिपत येथून विमा सखी योजनेला सुरुवात केली आहे. आता विमा सखी योजना हरियाणातून सुरू झाली, पण हळूहळू ही योजना देशभर राबविण्यात येणार आहे, म्हणजे या योजनेचा विस्तार देशभर केला जाणार आहे.

या योजनेतून महिलांना पहिल्या वर्षात महिन्याला सात हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. दुसऱ्या वर्षी महिन्याला सहा हजार रुपये देण्यात येतील, तर तिसऱ्या वर्षी महिलांना महिन्याला पाच हजार रुपये विद्यावेतन मिळेल, असं या योजनेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच महिलांना तीन वर्षात 2.26 लाख रुपये विद्यावेतन देण्यात येईल. तसेच महिलांना वर्षाला 48 हजार रुपये कमिशनही मिळेल असं देखील सांगितलं जातंय.

आता या योजनेत सहभागी होण्यासाठी सरकारने काही अटी देखील घातल्या आहेत. त्यात पहिली अट म्हणजे वयोगटाची आहे. 18 ते 70 वर्ष वयोगटातील महिलाच या योजनेसाठी अर्ज भरू शकतील किंवा योजनेत सहभागी होऊ शकतील. म्हणजेच किमान 18 वर्ष वय असावं तसंच जास्तीत जास्त वय 70 वर्ष असावं. किमान दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे.

ही योजना फक्त महिलांसाठीच आहे. तसेच सध्या जे एलआयसी एजंट आहेत, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना या योजनेत सहभागी होता येणार नाही. किंवा निवृत्त झालेल्या एजंटला देखील योजनेसाठी अपात्र करण्यात आलंय. मग आता योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांना नेमकं कागदपत्र काय लागतील आणि अर्ज कुठे करायचा? तर महिलांना अर्ज हा एलआयसीच्या वेबसाईटवर करायचा आहे. तसेच योजनेत सहभागी घेण्यासाठी महिलेचा पासपोर्ट साईजचा फोटो आवश्यक आहे. तसेच महिलेचा पॅन कार्ड, महिलेचा आधार कार्ड, वयाचा पुरावा, शिक्षणाचा पुरावा आणि बँकेचे तपशील हे कागदपत्र आवश्यक आहेत.

आता देशभरात तीन वर्षात दोन लाख विमा सखींची नियुक्ती करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी योजनेत सहभागी झालेल्या महिलांना तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर एलआयसी सोबत एजंट म्हणून काम करता येईल. म्हणजेच महिला इतर एजंटप्रमाणे कमिशनवर काम करू शकतील. या महिलांना एलआयसीचे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून घेण्यात येणार नाही. तसेच एलआयसीच्या इतर कर्मचाऱ्यांना जे काही लाभ मिळतात, ते लाभ या महिलांना मिळणार नाहीत. म्हणजेच विमा सखींना एलआयसीच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर लाभ मिळणार नाहीत.

मात्र ज्या विमा सखी पदवीधर असतील, त्यांना एलआयसी सोबत डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते. या विमा सखींना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात येतील, असं देखील सांगण्यात येतंय.

आता देशभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विमा सखी योजना सुरू केली, म्हणजे या योजनेचं उद्घाटन केलंय. पण नेमकं देशभरामध्ये योजना किती राबवली जाते?

आता हरियाणापासून ही योजना सुरू झालेली आहे, परंतु देश पातळीवर याचा विस्तार करेपर्यंत नेमकं किती दिवस लागतात, किती महिने लागतात हे अजून निश्चित करण्यात आलेलं नाहीये. तसंच राज्याने यामध्ये नेमका किती विमा सखी या निवडल्या जातील, किती महिलांना नेमका पैसा मिळेल हे अजून स्पष्ट करण्यात आलं नाहीये. परंतु सध्या 2 लाख विमा सखी निवडण्याचं एक उद्दिष्ट असल्याचं सांगण्यात येतंय.-Bima Sakhi Yojana Update 2024.

हे सुद्धा वाचाया महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हाप्त्याच वितरण सुरू-2024.

Leave a Comment