E Pik Pahani Online Registration 2024-ई-पिक पाहणी कशी करावी ?

E Pik Pahani Online Registration 2024- शेतकरी मित्रांनो, “मागेल त्याला सौर पंप” योजना असेल किंवा आपल्याला शेतात वीज कनेक्शन घ्यायचे असेल, तर आपल्या सातबाऱ्यावर विहीर असणे तितकेच गरजेचे असते. किंवा आपल्याला स्प्रिंकलर सेट घ्यायचा असेल, ठिबक शेतात करायचे असेल, तरीही आपल्या सातबाऱ्यावर विहीर असणे गरजेचे असते.

आता शेतकरी मित्रांनो, आपण या अगोदर काय करायचं की तलाठ्याजवळ जायचं आणि तलाठ्याला सांगायचं की विहीर लावायची आहे, आणि त्या वेळी तो तलाठी आपल्या सातबाऱ्यावर विहिरीची नोंद घ्यायचा. पण आता तलाठी तसं करत नाहीत. मग आता आपल्याला सातबाऱ्यावर विहीर लावायची आहे.

विहीर लावल्यावर आपल्याला “मागेल त्याला सौर पंप” योजना असेल, ठिबक असेल, स्प्रिंकलर असेल, वीज कनेक्शन असेल किंवा आपली जमीन ओलिताखाली आहे हे दाखवायचं असेल, तर आपल्याला विहीर लावणे गरजेचे आहे.

मित्रांनो, आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण सातबाऱ्यावर विहीर कशी लावायची याची सर्व माहिती बघणार आहोत.

आपल्याला विहीर लावायची असेल, तर त्या अगोदर तलाठ्याजवळ जावे लागायचे, पण आता तलाठ्याजवळ गेलो तरी तलाठी विहीर लावत नाहीत. त्याचे कारण असे आहे की, आपण जे काही शेतात पीक पेरणी करतो, मग ते पीक पेरा आता पर्यंत तलाठी लावत होते, मात्र आता तो बदलला आहे. ई-पिक पाहणीच्या माध्यमातून आपण शेतात जे काही पीक पेरले आहे ते किती क्षेत्र आहे हे आपल्याला ठरवता येते. आपल्याला आपल्या मोबाइलवरून हे नोंदवता येते, कारण आपण पीक पेरा भरत असतो आणि पीक विमा भरत असतो.

आता पीक विमा भरताना आपण जे क्षेत्र भरतो ते सरासरी अंदाजे असते कारण संपूर्ण पेरणी करताना अचूक क्षेत्र मोजता येत नाही. आता जर आपण पीक विमा भरताना अंदाजे क्षेत्र भरले, तर त्यावेळी तलाठ्याला माहित नसते की आपण शेतात काय पेरले आणि पीक विम्यात काय भरले आहे. त्यामुळे ई-पिक पाहणी यासाठी आलेली आहे की, शेतकरी नेमके काय पेरले ते त्यांना माहित व्हावे आणि नंतर ती माहिती सातबाऱ्यावर 72 तासांत अपडेट होत असते.

मदतीसाठी आणि ई-पिक नोंदणीसाठी- इथे क्लिक करा

आता शेतकरी मित्रांनो, “मागेल त्याला सौर पंप” योजनेचे अर्ज भरताना अनेक शेतकऱ्यांनी म्हटले की, “माझ्या सातबाऱ्यावर विहीर लावलेली नाही”. विहीर लावायची ई-पिक पाहणी प्रक्रियेत नसते, परंतु ज्या वेळी आपण खरीप पिकाची पेरणी करतो आणि पीक विमा भरतो तेव्हा ई-पिक पाहणी प्रक्रिया सुरू असते. भविष्यात ते काही महिने चालू राहील, परंतु सध्याच्या स्थितीत पीक विमा भरतानाच ती चालू असते.

ई-पिक पाहणीच्या माध्यमातून आपल्या शेतातील विहीर असेल, पीक पेरा असेल, किंवा शेतात घर, गोठा, मोठी झाडे यांची नोंद करता येते. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंद केली नाही त्यांनी 15 नोव्हेंबर पासून हे पिक पाहणीचे पोर्टल चालू होईल, त्यानंतर ई-पिक पाहणी करून घ्यावी. ई-पिक पाहणी करणे महत्वाचे आहे, कारण पीक विमा आपण भरतो आणि आपल्या शेतात सातबाऱ्यावर तो पेरा असणे आवश्यक आहे.

तसेच, वीज कनेक्शन, सौर पंप, यांसारख्या योजनेसाठी विहीर असणे गरजेचे आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या सातबाऱ्यावर नोंदणी करून घ्यावी, आणि 15 नोव्हेंबरनंतर ई-पिक पाहणीच्या माध्यमातून सर्व नोंदी करून घ्याव्यात.-E Pik Pahani Online Registration Update 2024.

हे सुद्धा वाचाशेतकऱ्यांसाठी ओळखपत्र नोंदणी सुरू-2024

Leave a Comment