Farmer ID Registration Online-शेतकऱ्यांसाठी ओळखपत्र नोंदणी सुरू

Farmer ID Registration Online 2024- शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला बँकेचे काम असो, पीक विमा काढायचा असो किंवा एखाद्या शासकीय योजनेचा फायदा घ्यायचा असेल, तर कागदपत्र गोळा करावी लागतात. त्या मध्ये कोणती कागदपत्रे असतात? आधारकार्ड आहे, बँकेचे पासबुक आहे, सातबारा आहे, होल्डिंग आहे, अशी कागदपत्रे गोळा करावी लागतात. आणि आता शेतकरी मित्रांनो, तशी कागदपत्रे सुद्धा गोळा करण्याची गरज पडणार नाही.

प्रत्येक शेतकऱ्याने ज्या शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा आहे, मग ती केंद्र सरकारची योजना असो, राज्य सरकारची योजना असो, अशा कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा पीक कर्ज जरी घ्यायचे असेल, तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आजची ही महत्त्वाची माहिती आहे.

मित्रांनो, काय होते, प्रत्येक शेतकऱ्याला कोणतेही काम पडले की कागदपत्रे गोळा करावी लागतात. मग वेळीवर तलाठी मिळत नाही, वेळीवर पासबुक सापडत नाही, कुठे पॅनकार्ड कुठे ठेवले ते आठवत नाही, आधार कार्ड कुठे ठेवले ते लक्षात येत नाही. मग आता त्याची गरज पडणार नाही. एक तर याअगोदर मित्रांनो, पॅनकार्ड असेल, आधारकार्ड असेल, शैक्षणिक डॉक्युमेंट्स असतील, अशांसाठी शासनाने डिजीलॉकरची व्यवस्था केलेली होती.

आता ही डिजीलॉकरची व्यवस्था जवळपास जास्तीत जास्त शैक्षणिक क्षेत्रात आहे, विद्यार्थी त्याच्या उपयोगात आहेत. मात्र आता शेतकऱ्यांसाठी सुद्धा अशी एक योजना आली आहे, केंद्र सरकारने जिच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केल्यास कोणत्याही शेतकऱ्याला कागदपत्रे गोळा करत बसण्याची गरज पडणार नाही. त्यासाठी ‘एग्रीस्टॅक’ च्या माध्यमातून डिजिटल फार्मर आयडी ही एक नवीन योजना आली आहे. जसा आतापर्यंत माणसांचा ओळख म्हणून आधारकार्ड, आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्ड, विद्यार्थ्यांसाठी जसा आयडी कार्ड, तसाच आता शेतकऱ्यांचा शेतकरी रजिस्ट्रेशन करणं गरजेचे आहे.

ज्या शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा आहे, मग ती केंद्र शासनाची योजना असो, राज्य शासनाची असो, पीक कर्ज असो, पीक विमा असो, ज्या काही गोष्टींचा लाभ घ्यायचा आहे, त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याचे रजिस्ट्रेशन करणं गरजेचे आहे.

‘एग्रीस्टॅक’ च्या माध्यमातून शेतकऱ्यांचा डिजिटल फार्मर आयडी मिळणार आहे. यासाठी रजिस्ट्रेशन सुद्धा चालू झालं आहे. यासाठी काय कागदपत्रे लागणार आहेत, नेमकं हे रजिस्ट्रेशन कसं करायचं याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत. तर, सर्वप्रथम आपल्याला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल, तर लिंक दिलेली आहे. हे रजिस्ट्रेशन सहज काही मोबाइलवर करता येत नाही. हे आपल्याला कुठेतरी सीएससी सेंटरच्या माध्यमातून किंवा आपल्याकडे स्वतः घरी संगणक असेल, तर संगणकाच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

ओळखपत्र नोंदणीसाठी- येथे क्लिक करा

आता यासाठी काय लागणार आहे? तर यासाठी आपल्याकडे आधारकार्ड असलं पाहिजे, आपल्या जमिनीचा सातबारा असला पाहिजे, होल्डिंग असलं पाहिजे आणि आपली दोन, तीन, चार कितीही जागेवर जमीन असली तरी तो सातबारा असला पाहिजे. म्हणजे आपल्याला संपूर्ण जमीन त्या माध्यमातून करता येते. आणि मग आपल्या पूर्ण जमिनीच्या क्षेत्रानुसार खत किती लागणार आहे, त्या जमिनीसाठी कोणत्या योजना मिळणार आहेत, यासाठी हा फार्मर आयडी आपल्याला उपयोगी पडणार आहे.

म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आता ही कागदपत्रे घेऊन आपण एखाद्या सीएससी सेंटरवर जायचं किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जायचं आणि डिजिटल फार्मर आयडीसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपलं प्रोविजनल रजिस्ट्रेशन होणार आहे आणि त्यानंतर ज्या वेळी त्याचं अप्रूवल मिळेल, त्यानंतर आपल्याला डिजिटल फार्मर आयडी हे कार्ड मिळणार आहे.

त्या कार्डाच्या माध्यमातून आता तुम्ही हे रजिस्ट्रेशन केलं मग याचा फायदा कसा घ्यायचा? तर शेतकरी मित्रांनो, जो आयडी शेतकऱ्यांसाठी तयार होणार आहे, त्या आयडीच्या माध्यमातून समजा आपल्याला महाडीबीटीच्या योजनेचा फायदा घ्यायचा असेल, तर आपल्याला आधी तिथे पूर्ण रजिस्ट्रेशन करणं, आपल्या जमिनीची जी काही माहिती आहे ती माहिती भरणं, अशा सर्व गोष्टी कराव्या लागत होत्या. पण हा आयडी मिळाल्यावर नुसतं आयडी टाकलं की आपली संपूर्ण माहिती त्या मध्ये येणार आहे आणि आपण कोणत्या योजनेत बसतो ते समजणार आहे. किंवा बँकेत पीक कर्ज घ्यायचं असेल, तर आधी हे सर्व कागदपत्रे घेऊन मॅनेजरला भेटायला लागत होतं. पण जर फार्मर आयडी असेल, तर तो फार्मर आयडी बँकेत दिला की त्या आयडीच्या माध्यमातून बँक मॅनेजरला आपली सर्व माहिती समजणार आहे. म्हणजे आपल्याला फिजिकल कागदपत्रे बँकेत घेऊन जाण्याची गरज पडणार नाही. असा हा फार्मर आयडी असणार आहे.

म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आपण आपल्या जवळच्या सीएससी सेंटरला किंवा महा ई-सेवा केंद्रावर जाऊन प्रत्येक शेतकऱ्याने रजिस्ट्रेशन करून घ्यावं.-Farmer ID Registration Online Update 2024.

हे सुद्धा वाचासांगली जिल्ह्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर-2024

Leave a Comment