हे कराल तरचं मिळणार बाल संगोपन योजनेचे अनुदान- Bal Sangopan Yojana

Bal Sangopan Yojana 2024: मित्रांनो, बालसंगोपन योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्यामध्ये राबवली जाणारी बालसंगोपन योजना आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना(Bal Sangopan Yojana) या नावाने ओळखली जात आहे. याच्या संदर्भातील नवीन जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे. या योजनेच्या अटी-शर्ती बदलण्यात आलेल्या आहेत, योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे, आणि याच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे.

याचे अर्ज कसे केले जातात, लागणारी कागदपत्रे, अटी-शर्ती, पात्रता निकष ही सर्व माहिती घेतल्यानंतर बऱ्याच साऱ्या लाभार्थी मित्रांच्या माध्यमातून कमेंट करण्यात आल्या होत्या की, आमचं या योजनेचं अनुदान बंद झालंय, याचं अनुदान कधी येणार? आणि मित्रांनो, याच्यासंदर्भातील काही महत्त्वाची अशी माहिती आणि या योजनेच्या संदर्भातील नवीन आलेले एक महत्त्वाचं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

शासनाच्या कोणत्याही योजनांच्या अनुदानाचे वितरण आता फक्त डीबीटीच्या(DBT) माध्यमातून केलं जातंय. डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचे वितरण करण्यासाठी बँक खात्याला आधार सीडिंग झालेलं असणं अतिशय गरजेचे आहे.

योजनेच्या अंतर्गत सुद्धा या बालकाचं मानधन अनुदान वितरित करण्यासाठी, जर बालक दहा वर्षांच्या आतील असेल (म्हणजे बालकाचे वय जर दहा वर्षांपेक्षा कमी असेल), तर अशा बालकाचं पालकासोबत एक संयुक्त बँक खातं असणं गरजेचं आहे. त्या बँक खात्याला त्या बालकाचा आधार क्रमांक सीडिंग झालेला असणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या आधार सीडिंग झालेल्या बँक खात्यामध्येच, मग त्या संयुक्त बँक खात्यामध्ये, त्या बालकाचं अनुदान वितरित केलं जाणार आहे.

आता बालकाचं वय जर दहा वर्षांपेक्षा जास्त असेल, तर त्या बालकाच्या नावाने स्वतंत्र बँक खातं उघडून त्या बँक खात्याला त्या बालकाचा आधार क्रमांक सीडिंग करणं गरजेचं आहे. अशाप्रकारे, 10 वर्षांच्या वरील बालकाचं आधार सीडिंग झालेल्या बँक खात्यामध्ये त्या बालकाचं मानधन अनुदान वितरित केलं जाणार आहे.

म्हणजे, 10 वर्षांच्या खालील बालकांसाठी संयुक्त पालकासोबतचं बँक खातं, आणि 10 वर्षांच्या वरील बालकांसाठी स्वतःचं सेव्हिंग खातं, अशाप्रकारे आधार सीडिंग झालेल्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून या अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे.

ज्यांचे अनुदान येत नसेल, त्यांनी आपलं बँक खातं आधार सीडिंग झालं आहे का, ते तपासा. जर झालेलं नसेल, तर ते करून घ्या. यामध्ये 10 वर्षांच्या खालील आणि 10 वर्षांच्या वरील अशा दोन प्रकारांमध्ये आधार सीडिंग आहे. आधार सीडिंग केल्यानंतरच या योजनेच्या अंतर्गत वितरित होणारं अनुदान त्या बालकाच्या, त्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये क्रेडिट केलं जाणार आहे.- Bal Sangopan Yojana Update 2024.

हे सुद्धा वाचाआजच बनवा Apaar ID Card-द्यावं लागणार हे कागदपत्र

Leave a Comment