Dadasaheb gaikwad sabalikaran yojana 2024: राज्यात भूमी लाभार्थ्यांना जमीन खरेदीसाठी 100% अनुदान योजना राबवली जाते आणि याच योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती अपडेट आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मित्रांनो, मुळात राज्यामध्ये दोन प्रवर्गासाठी, अर्थात अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती, या दोन्ही प्रवर्गासाठी दोन वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. पहिली म्हणजे आदिवासी बांधवांसाठी राबवली जाणारी, अर्थात अनुसूचित जमातीसाठी “आदिवासींचे बळकटीकरण व स्वाभिमान योजना,”(Dadasaheb gaikwad sabalikaran yojana) आणि अनुसूचित जातीच्या, अर्थात एससी प्रवर्गाच्या लाभार्थ्यांसाठी “कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना.”
या दोन्ही योजनेच्या अंतर्गत भूमी लाभार्थ्यांना कोरडवाहू जमिनीसाठी चार एकरपर्यंत, तर बागायत जमिनीसाठी दोन एकरपर्यंत जमिनी खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त 16 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिलं जातं, ज्यामध्ये कोरडवाहूसाठी प्रति एकर चार लाख रुपये, तर बागायत जमिनीसाठी प्रति एकर आठ लाख रुपयांपर्यंत अनुदान हे ग्राह्य धरलं जातं.
याच्यामधील “कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेच्या” अंतर्गत आता विविध जिल्ह्यांमध्ये प्रस्ताव मागवण्यात आलेले आहेत. आता हे प्रस्ताव मागवण्यात आलेले आहेत, ही माहिती घेतल्यानंतर मग याचा प्रस्ताव दाखल कसा करायचा, याच्या अंतर्गत नेमका अर्ज कसा केला जातो, हे देखील महत्त्वाचं आहे.
याच्या अंतर्गत दोन प्रकारांमध्ये अर्ज प्रस्ताव दाखल केले जातात. एकतर शेतकऱ्याच्या जमीन विक्रीचा प्रस्ताव आणि भूमी लाभार्थ्याला जमीन मागणीसाठीचा अर्ज, असे दोन याच्यामध्ये प्रकार येतात. एखाद्या गावामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याला आपली जमीन विक्री करायची असेल, तर अशी चार एकरच्या आसपास असलेली जमिनीचा प्रस्ताव समाज कल्याण विभागामध्ये सादर करायचा असतो.
समाज कल्याण विभागाकडे जमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचा प्रस्ताव दाखल केला जातो. याच्यानंतर त्याच गावांमधील जमीन मागणी करणाऱ्या शेतकऱ्याचा एक अर्ज दाखल केला जातो, ज्यामध्ये त्या शेतकऱ्याला भूमी नसलेल्या शेतकऱ्याला या जमीन मागणीचा अर्ज दाखल करता येतो. त्या अर्जानुसार ज्या शेतकऱ्याला जमीन विक्री करायची आहे, त्या शेतकऱ्याकडची जमीन विक्री म्हणजे खरेदी करून घेऊन, ही भूमी लाभार्थ्याला दिली जाते. आणि अशा प्रकारचे आता हे प्रस्ताव विविध जिल्ह्यांमध्ये मागवण्यात आलेले आहेत.
जमीन मागणीचा अर्ज पाहण्यासाठी – इथे क्लिक करा.
याचा प्रस्ताव पीडीएफ स्वरूपामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. वरच्या लिंकमध्ये तुम्हाला भेटून जाईल. जमीन मागणीचा अर्ज पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये याचे प्रस्ताव जर मागवण्यात आलेले असतील, तर समाज कल्याण विभागामध्ये माहिती घ्या. आणि प्रस्ताव जर जमा केले जात असतील, तर आपल्या गावामधील जमीन विक्रीचा प्रस्ताव आणि जमीन मागणीचा अर्ज हे दोन्ही सादर करून या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा.-Dadasaheb gaikwad sabalikaran yojana Update 2024.
हे सुद्धा वाचा– मागेल त्याला सौर पंप payment आणि vendor selection 2024.