Karj Mafi Maharashtra 2024- शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्ज माफी मागच्या वर्षी मिळायला पाहिजे होती. आता त्याचे कारण असे होते की आज दोन वर्षांपासून पाऊस कमी झाला. शेतकऱ्याचे पीक वाया गेले. पाऊस कमी झाल्यामुळे कारण उगवण झाली नाही, काही उगवले तरी त्याला माळ लागला नाही. त्यामुळे सोयाबीन, कापूस अशी पिके वाया गेली आणि मागच्या वर्षी सुद्धा भाव मिळाला नाही. पाहिजे तसे शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे आणि यावर्षी तर नक्कीच मिळायला पाहिजे होते.
कारण गेल्या वर्षी पाऊस नसल्यास अतिवृष्टी झाली. जास्त पाऊस झाला आणि जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्याचे पीक वाहून गेले. कापूस असेल, सोयाबीन असेल, हरभरा असेल, तूर असेल अशा शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले. आणि आचारसंहिता लागेपर्यंत शेतकऱ्याचे कर्ज माफ करावे, कारण शेतकरी कर्ज भरू शकत नाही. महत्त्वाचे म्हणजे त्यात एकतर पाऊस कमी असतो किंवा अतिवृष्टी किंवा पाऊस नसतो अशी परिस्थिती असते. उत्पन्न घटते, घट उत्पन्नामुळे होते, आणि त्या पिकाला भाव सुद्धा मिळत नाही.
मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खत असेल, बी-बियाणे असेल अशा परिस्थितीत कर्ज घेतले. उत्पन्न जर झाले नाही तर तो शेतकरी भर कसा करणार? शेतकऱ्याचे कर्ज माफ व्हायला पाहिजे, कारण एकतर हे सरकार शेतकऱ्यांना मालाचे भाव वाढवत नाही. त्यावर निर्बंध आणले जातात, तेल आयात केले जाते म्हणून सोयाबीनचा भाव पडतो, कापसाच्या गाठी आयात केल्या जातात म्हणून कापसाचे भाव पडतात. त्यामुळे शेतकऱ्याचे कर्ज माफ व्हायला पाहिजे होते. आपल्यापैकी किती जणांना वाटते की खरच शेतकऱ्याचे कर्ज माफ व्हायला पाहिजे होते?
राज्यात गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली, नैसर्गिक आपत्ती आल्या, त्यामुळे तर माफ केलेच पाहिजे होते. पण सध्या राज्यात एक कोटी 31 लाख शेतकऱ्यांपैकी 15,46,379 शेतकऱ्यांचे बँकांचे कर्ज थकले आहे. हा बँकांचा आकडा आहे. शेतकरी मित्रांनो, विविध बँकांचे 3,495 कोटी कर्ज थकित असल्याचे राज्यस्तरीय बँकर्स कमिटी कडून हे आकडेवारी समोर आली आहे.
आणि अशा परिस्थितीत मग शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हायला पाहिजे होते. आता त्यात राज्यातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वाशिम या नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे 56 कोटी रुपयांपर्यंत थकबाकी आहे आणि उर्वरित 27 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या थकबाकीचे प्रमाण 400 ते 2857 कोटी रुपयांपर्यंत आहे.
मित्रांनो, शेतकऱ्यांचे कर्ज हे सरासरी एक शेतकऱ्याचे कर्ज लाख-दोन लाख रुपयांपर्यंत असते. मग या सरकारी व्यवस्थेत जे मोठे उद्योगपती आहेत, त्यांचे कर्ज माफ करता येते, त्यांची कोट्यवधी कर्ज माफ होतात आणि शेतकऱ्यांचे लाख-दोन लाख रुपयांचे कर्ज असते. एवढे काही मोठे नसते, मात्र त्या कर्जामुळे त्या शेतकऱ्यांना खूप सपोर्ट मिळतो, फायदा होतो आणि त्यांना पुन्हा कर्ज मिळते. कारण ज्यांचे नुकसान झालेले आहे, त्या कर्ज माफीमुळे त्यांच्या काही तरी त्या भरून निघते.
परंतु तसं होत नाही. उद्योगपतींचे कर्ज माफ होते, पण शेतकऱ्यांचे नाही. हेच प्रमुख कारण आहे. मित्रांनो, जालना, बुलढाणा, परभणी, पुणे, सोलापूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, धाराशिव, त्यानंतर नाशिक, नागपूर, कोल्हापूर, धुळे, बीड, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नगर अशा 17 जिल्ह्यांतील शेतकरी सर्वाधिक थकबाकीदार आहेत.
या आकडेवारीवरून असे दिसते की सध्या बँकांकडून थकबाकीची वसुली सुद्धा चालू आहे. आता हे झाले बँकांचे कर्ज, पण काही शेतकऱ्यांचे असते ते सावकाराचे. त्यांचा माल आला की लगेच दारात उभे राहतात. मग अशा परिस्थितीत बँकेचे कर्ज भरायचे का? त्या सावकाराचे द्यायचे का? मुलांचे लग्न करायचे का? मुलांचे शिक्षण करायचे का? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहतो. आणि शेतकऱ्यांचा वाली कोणी आहे का, नाही असा सुद्धा प्रश्न पडतो.
आणि प्रत्येक शेतकऱ्याने विचार करणे गरजेचे आहे. आता सध्या निवडणुकीचे वातावरण चालू आहे. महाविकास महायुतीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की आमचे सरकार आल्यानंतर संपूर्ण शेतकऱ्यांचे कर्ज आम्ही माफ करू. आता मित्रांनो, मला एक वाटते की, यांचे सरकार होते, आचारसंहिता लागेपर्यंत शेतकरी वाट बघत होते की कर्जमाफी मिळेल, कुठेतरी आपल्याला फायदा होईल.
त्यामुळे शेतकरी वाट बघत होते की कर्जमाफी मिळेल. त्यांनी आता कर्जमाफी दिली असती, तर शेतकऱ्यांना आधार मिळाला असता. तर आता त्यानंतर दुसरे उद्धवजी ठाकरे म्हणतात, महाविकास आघाडीचे नेते, आमचे सरकार आल्यानंतर आम्ही तीन लाखांपर्यंत कर्ज माफ करू.
आता, जेव्हा हे खुर्चीत बसलेले असतात, तेव्हा ह्या गोष्टी करायला काय हरकत आहे? जर त्यावेळी हे केले असते तर आता जी त्यांना धावाधाव करावी लागत आहे. शेतकऱ्यांना गावोगावी, खेडोपाडी फिरावे लागत आहे. ही परिस्थिती जर त्यावेळी कर्जमाफी दिली असती तर निर्माण झाली नसती. आता आपल्याला वाट बघावी लागेल निवडणुका झाल्यावर.-शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्ज माफी जाहीर-karj mafi maharashtra update 2024.
हे सुद्धा वाचा– ई-पिक पाहणी कशी करावी ?-E Pik Pahani Online Registration 2024