Pik Vima Maharashtra- खरीफ हंगाम व रबी हंगाम 2023 च्या विमा वितरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचे नियोजन आहे. नियमांनुसार 110% पेक्षा जास्त नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना मंजूर झाल्यास, त्याची रक्कम शासनाच्या माध्यमातून द्यावी लागते आणि 80% पेक्षा कमी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाल्यास उर्वरित रक्कम ही शासनाला परत करावी लागते.
याच निकाला नुसार, आपण पाहिले होते की महाराष्ट्रातील जवळपास जिल्हे जसे की सातारा, जलगाव, चंद्रपूर, तसेच सोलापूर, अहमदनगर आणि नाशिक या सर्व जिल्ह्यात पीक विमा(Pik Vima) मंजूर करण्यात आलेला होता. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून जवळपास 1927 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आलेली होती, आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून दिलेल्या या रकमेमध्ये पीक विम्याचे वितरण करण्यात आले होते. मात्र, असेच अनेक जिल्हे आहेत जिथे शेतकऱ्यांचे नुकसान हे 110% पेक्षा जास्त आहे आणि पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शासनाकडून या अतिरिक्त निधीची मागणी केलेली आहे.
अशा प्रकारे, खरीफ हंगाम आणि रबी हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झालेला जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 497 कोटी 93 लाख रुपयांच्या पीक विम्याचे वितरण करण्यासाठी पीक विमा(Pik Vima) कंपनीच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये खरीफ हंगामासाठी 252 कोटी 51 लाख रुपये तर रबी हंगामासाठी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून खरीफ पीक विमा वितरणाचे पीक विमा रक्कम वितरित करण्यात आलेली आहे.
रबी हंगामातील पीक विमा वितरण करत असताना, पीक विमा कंपनीच्या माध्यमातून 125 कोटी 23 लाख रुपयांचे वितरण करण्यात आलेले आहे. परंतु आता, या शेतकऱ्यांचे नुकसान हे 110% पेक्षा जास्त दाखवले जात असल्याने, 110% पर्यंतची रक्कम ही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेली आहे. यासाठी खरीफ आणि रबी हंगाम या दोन्ही हंगामांसाठी मिळून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून 264 कोटी 7 लाख रुपयांचे वितरण करण्यात आलेले आहे.
आता, या शेतकऱ्यांना मंजूर असलेला उर्वरित पीक विमा वितरण करण्यासाठी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कृषी आयुक्तालयाकडे जवळपास 233 कोटी रुपयांची मागणी केलेली आहे. हा निधी वितरित झाल्यानंतर शेतकऱ्यांना वितरण केले जाईल. अशा प्रकारे, माहिती आता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जात आहे.
सध्या निवडणुकीची आचार संहिता असल्यामुळे शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारे आता कुठलाही निधी वितरित केला जाण्याची शक्यता नाही. परंतु, एकीकडे या जिल्ह्यांचा पीक विमा मंजूर आहे, परंतु उर्वरित पीक विम्याचे वाटप हे आता शासनाच्या माध्यमातून ज्या प्रमाणे सहा जिल्ह्यांचा वितरण केले गेले, त्याच प्रमाणे बुलढाणा जिल्ह्याचे वितरण केले जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झालेला आहे त्या शेतकऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. मित्रांनो, याच प्रमाणे इतर काही जिल्हे आहेत जिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, आणि त्यासाठी सुद्धा कंपनीच्या माध्यमातून शासनाकडे मागणी केली जाऊ शकते, आणि हा निधी उपलब्ध झाल्यानंतर त्या जिल्ह्यांमध्ये वितरण होऊ शकते.-Pik Vima Maharashtra Update.
हे सुद्धा वाचा– नवीन विहीरीसाठी 4 लाख अनुदान-Vihir Anudan yojana 2024