Ladki Bahin Yojana: मित्रांनो, राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आणण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना(Ladki Bahin Yojana). या योजनेच्या आणि या योजनेच्या लाभार्थ्यांच्या आशीर्वादावरती सरकारला पुन्हा एकदा सत्तेमध्ये बसण्याची संधी मिळालेली आहे.
अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना म्हणून पाहण्यात आलेली आहे. याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली होती. योजनेच्या अॅडव्हान्समध्ये हप्ते असतील, योजनेच्या हप्ते असतील, योजनेच्या लाभार्थ्यांची निवड असेल — या सर्व प्रक्रिया जलदगतीने पार पाडून शासनाच्या माध्यमातून अतिशय व्यापकपणे ही योजना राबवण्यात आली.
या योजनेचे परिणामदेखील तेवढेच दुर्गामी ठरले. विधानसभेचे लागलेले निकाल हे अनपेक्षित लागले. शासनाला असलेल्या अपेक्षेपेक्षा जास्त जागा या ठिकाणी जिंकून आलेल्या आहेत.
हे सर्व होत असताना आपण पाहिलेले की निवडणुकीची जी काही घोषणापत्रे, वचननामे देण्यात आलेले होते, त्यामध्ये दोन्ही बाजूंनी या लाडकी बहीण योजनेला(Ladki Bahin Yojana) पुढे राबवून त्या योजनेच्या निधीच्या तरतुदीमध्ये, योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करण्याची घोषणा करण्यात आलेली होती.
याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत किंवा याच प्रकारे महालक्ष्मी योजना(Mahalakshmi Yojana) राबवून ₹3000 महिना देण्याची घोषणा करण्यात आलेली होती. तर सध्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या लाडकी बहीण योजनेमध्ये ₹1500 च्या ऐवजी ₹2100 मानधन देण्याची घोषणा करण्यात आलेली होती.
या योजनेचा अभूतपूर्व असा प्रतिसाद या योजनेच्या पार्श्वभूमीवरती झालेल्या महिलांच्या मतदानात आणि सरकारला मिळालेल्या जागांमध्ये दिसून आला. या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहिलं, तर पूर्णपणे लाडकी बहीण योजनेच्याच आशीर्वादाने हे सरकार स्थापन झालेलं आहे.
त्यामुळे आता या योजनेची जी काही पुढची गती असणार आहे, पुढची जी अंमलबजावणी असणार आहे, ती अतिशय व्यापकपणे होणार आहे.
सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेच्या संदर्भातील पहिला मोठा निर्णय होऊ शकतो, ज्याच्यामध्ये शासनाच्या माध्यमातून केलेली जी घोषणा आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे ₹1500 च्या ऐवजी ₹2100 रुपयांचे मानधन लागू केले जाऊ शकते आणि तसा प्रकारे लागू करावाच लागणार आहे.
लवकरच याच्या संदर्भातील अधिकृत घोषणा केली जाईल, याचा जीआर निर्गमित केला जाईल. येणारे जे काही हप्ते असतील, ते हप्ते या महिला लाभार्थ्यांना वितरित केले जातील. कारण ऑलरेडी नोव्हेंबरपर्यंतचे हप्ते शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेले आहेत.
डिसेंबरच्या हप्त्याची प्रक्रिया ऑलरेडी करण्यात आलेली आहे. हा हप्ता साधारणपणे 26 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबरपासून वितरित होईल, अशी शक्यता आहे. यामध्ये थोडा विलंब होऊ शकतो.
पुढील येणारे जे हप्ते असतील, ते हप्ते साधारणपणे ₹2100 रुपये करण्याची तयारी शासनाच्या माध्यमातून केली जाणार आहे.
एकंदरीत, आपण जर पाहिलं, तर शासनाचं जे बजेट असेल, ते बजेट आता सादर झाल्यानंतर म्हणजे 2025 बजेट सादर झाल्यानंतर यामध्ये निधीची तरतूद केल्यानंतर साधारणपणे एप्रिलच्या महिन्यापासून महिला लाभार्थ्यांना ₹2100 रुपयांच्या अनुदानाचं वितरण होण्यासाठी सुरुवात केली जाऊ शकते.-Ladki Bahin Yojana Update 2024.
हे सुद्धा वाचा– भवांतर योजना-शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनातील मोठी अपेक्षा.