लाडक्या बहिणींना ₹२१०० कधीपासून मिळणार?-Ladki bahin yojana 2024

Ladki bahin yojana 2024: मित्रांनो, अगदी ठरल्याप्रमाणे 5 डिसेंबर 2024 रोजी राज्याचे नवीन मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचा शपथविधी पार पडलेला आहे. राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे, आणि या शपथविधीची प्रतीक्षा राज्यातील लाखो-कोटी नागरिकांना लागलेली होती. कारण हा शपथविधी झाल्यानंतरच निवडणुकीपूर्वी केलेले वचननामे, ज्या काही घोषणा आहेत, त्या घोषणांना पूर्णत्व येणार आहे.

याच्यामधील एक महत्त्वाची घोषणा, एक महत्त्वाचं वचन होतं, ते म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपये मानधन. बऱ्याचजणांच्या माध्यमातून, तर निवडणुकीचे निकाल लागल्यापासूनच, हे 2100 रुपये कधी दिले जाणार यावर चर्चा सुरू होती. बऱ्याच साऱ्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून तर “सरकारला 2100 रुपयांच्या मानधनाचा विसर पडलाय का?” अशा प्रकारच्या बातम्या देखील छापायला सुरू झाल्या होत्या.

याच पार्श्वभूमीवर, आज शपथविधी झाल्याबरोबर जी काही पत्रकार परिषद पार पडलेली आहे, त्या पत्रकार परिषदेमध्ये दीपक भातो यांच्या माध्यमातून हा प्रश्न विचारण्यात आला. “लाडक्या बहिणींना आश्वासित केलेलं 2100 रुपये मानधन कधीपासून दिलं जाणार?” याच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे की लाडक्या बहिणींची स्कूटनी होऊन, त्यामधून मोठ्या प्रमाणात लाभार्थी बाद केले जाणार. यावर नवीन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून उत्तर देण्यात आले आहे की, “ही जी काही 2100 रुपये मानधन देण्याची घोषणा आहे, हे एक वचन आहे जे पूर्ण केलं जाणार आहे.”

परंतु यासाठीची जी काही तरतूद आहे, ती आता बजेटमध्ये पहिली मांडणी केली जाईल. त्यासाठी इन्कमचे सोर्स तपासले जातील आणि त्यानंतर येणाऱ्या काळापासून, म्हणजे एका नवीन वर्षापासून, या 2100 रुपये मानधनाची अंमलबजावणी केली जाऊ शकते.

यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की यासाठी बजेट पार पाडणे गरजेचं असतं. कारण कुठल्याही बाबीमध्ये, कुठल्याही योजनेमध्ये काही बदल करायचे असतील तर त्यासाठी निधीची तरतूद करणे गरजेचं असतं. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या मंजुरीची आवश्यकता असते. या सर्व मंजुऱ्या, यासाठीचे प्रस्ताव, आणि त्यानंतर पुढील बजेटचं नियोजन हे सर्व बजेटमध्ये मांडणी केलं जाईल. त्या बजेटला मंजुरी येईल आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल. याच प्रकारचं उत्तर आज मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे.

याच्याव्यतिरिक्त राहिला प्रश्न स्कूटनीचा. यामध्ये आपण पूर्वी सुद्धा पाहिले आहे की बऱ्याच योजनांचे लाभार्थी, योजना सुरू केल्या जात असताना, त्यामध्ये अर्ज भरून पात्र ठरतात. परंतु यानंतर हळूहळू, टप्प्याटप्प्याने बरेचसारे लाभार्थी बोगस सापडतात. बरेचसारे चुकीच्या पद्धतीने लाभ घेणारे सापडतात. जसं की आपण पाहिलं होतं की अर्ज करत असताना निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी सुद्धा अर्ज केलेले आहेत.

परंतु आता अर्ज केला आणि लाभार्थी म्हणून पात्र ठरला तरी आधार एकच असल्यामुळे, योजनेची दुरुक्ती कुठेही शक्य नाही. त्यामुळं साहजिकच, यामधून जे लाभार्थी पात्र नसतील, ते साईडला होणार आहेत. असे बरेचसारे लाभार्थी, बऱ्याच साऱ्या बाबी पुढे निदर्शनास येतील. जे काही योजनेच्या अंतर्गत अपात्र असतील, ते अपात्र ठरवले जातील, अशा प्रकारची माहितीही त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.

योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि पुढे राबवण्यासाठी येणार आहे. यामध्ये कोणालाही अपात्र ठरवलं जाणार नाही, परंतु जे योजनेच्या अंतर्गत पात्र नसतील, त्यांची छटणी केली जाईल. हे देखील मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे, मोठ्या प्रमाणात विचारला जाणारा जो प्रश्न होता की नेमके पैसे कधीपासून मिळणार, सरकार आलं, हा हप्ता 2100 रुपयांचा मिळणार का वगैरे-वगैरे, जे काही चर्चांना उधाण आले होते, ते आता थोडी काळ शांत होण्यासाठी मदत होईल.

राहिला विषय येणाऱ्या हप्त्याचा. येणारा हप्ता हा डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्रितपणे मिळून, संक्रांतीच्या सणाच्या पूर्वीच देण्याचं नियोजन शासनाचं आहे. त्यासाठी आता नवीन मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडेल आणि त्या बैठकीमध्ये या कार्यक्रमाची रूपरेखा आयोजित करून पुढील हप्त्याचं वितरण केलं जाईल.

एकंदरीत, योजनेच्या जीआरनुसार, येणाऱ्या प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला हप्त्याचं वितरण करण्याची अंमलबजावणी करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे, 15 डिसेंबरपूर्वी सुद्धा या हप्त्याचं वितरण केलं जाईल. परंतु, एकंदरीत आता सरकार जे काही गतीने काम करतंय, ज्या काही या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत, त्या पार्श्वभूमीवर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता शासनाच्या माध्यमातून एकत्रितपणे वितरित केला जाऊ शकतो.-Ladki bahin yojana update 2024.

हे सुद्धा वाचाजमीन खरेदीला शासनाचं 100% अनुदान-2024

Leave a Comment