लाडकी बहीण योजनेत कोणताही बदल नाही-Ladki bahin yojana update 2024

Ladki bahin yojana update 2024: मित्रांनो, राज्यातील महिला लाभार्थ्यांकरता राबवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना(Ladki bahin yojana). या योजनेच्या अनुदानामध्ये वाढ, या योजनेच्या निकषांमध्ये बदल, या योजनेच्या नियमांमध्ये बदल, नवीन आरटी शर्ती लावण्यात आल्या. राज्यातील लाखो महिला लाभार्थी अपात्र होणार अशा अनेक साऱ्या बातम्या न्यूज चॅनेल, वर्तमानपत्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जात आहेत आणि परिणामी या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या, योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला लाभार्थ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे.

घबराहट निर्माण झालेली आहे. आपण या योजनेच्या अंतर्गत अपात्र केलं जाणार का? आपल्याला या योजनेच्या अंतर्गत येणारे हप्ते बंद होणार का? अशा प्रकारचं सर्व वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे.

एकंदरीत आपण पाहिलेलं आहे की योजना सुरू होत असल्यापासूनच योजना राबवली जाणार नाही, योजना राबवली तर याच्या अंतर्गत हप्ते मिळणार नाहीत, हप्ते मिळाल्यानंतर निवडणुकीनंतर बंद केले जाणार, आता निवडणुकीनंतर हप्ता वाढ होणार, तर त्याच्यामध्ये नवीन काही लाभार्थी अपात्र केले जाणार अशा अनेक साऱ्या बातम्या याच्यामध्ये पेरल्या जात आहेत, पसरवल्या जात आहेत.

याच पार्श्वभूमीवरती या योजनेच्या मध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत का? केले जाणार आहेत का? यासंदर्भातील स्पष्टीकरण देणे गरजेचे होतं, आणि अशी स्पष्टीकरण आता प्रशासनाच्या माध्यमातून द्यायला सुरुवात करण्यात आलेली आहे.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी, पुणे यांच्या माध्यमातून एक प्रेस नोट प्रकाशित करण्यात आलेली आहे. ज्या प्रेस नोटच्या माध्यमातून या योजनेच्या संदर्भात पसरवण्यात येणाऱ्या बातम्या या फेक असून, व्हायरल असून, यामुळे समाजामध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. आणि या संदर्भात वेगवेगळ्या कार्यालयाकडून विचारणा करण्यात येत असल्या कारणामुळे ही एक प्रेस नोट काढून जे काही बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, सर्व पुणे यांना उद्देशून हे प्रसिद्धी पत्रक प्रकाशित करण्यात आलेलं आहे.

या अनुषंगाने जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास, पुणे जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून या सर्व कार्यालयाला कळवण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तींमध्ये तसेच योजनेच्या सध्यस्थिती कार्यपद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही.

योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपल्यास कळवण्यात येईल. सदर योजनेमध्ये चुकीच्या बातम्यामुळे लाभार्थी व जनतेच्या मनामध्ये कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरता आपण आपल्या स्तरावरून सर्व अंगणवाडी सेविका मार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी. आणि यामुळे जनतेमध्ये किंवा या महिला लाभार्थ्यांमध्ये जे काही भीतीचं वातावरण निर्माण होतंय, ते कुठेतरी कमी होण्यासाठी मदत होणार आहे.

प्रशासनाच्या माध्यमातूनच हे पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काढण्यात आलेलं आहे. अशीच प्रेस नोट आता प्रत्येक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काढावी. शासनाच्या स्तरावरून सुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे एक प्रेस नोट, एक प्रसिद्धी पत्रक किंवा अशा प्रकारचे एक न्यूज चॅनेलला बाईट देणं गरजेचं आहे. जेणेकरून या महिला लाभार्थ्यांना कुठेतरी दिलासा मिळणार आहे.

नाहीतर आपण जर पाहिलं, तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत या योजनेच्या निकषामध्ये हजार बदल केले जातात, जेणेकरून महिलांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार होत आहे. त्याच्यामुळे या योजनेच्या अटी, शर्ती, निकषामध्ये कुठलाही बदल करण्यात आला नाही.

योजनेची कार्यपद्धती बदलायची असेल किंवा योजनेच्या अटी-शर्तींमध्ये बदल करायचा असेल, तर त्याच्या संदर्भातील सेपरेट जीआर निर्गमित केला जाईल. आणि जीआर आल्यानंतर त्याच्या संदर्भातील माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली जाते.

एकंदरीत आपण जर पाहिलं, तर कुठल्याही योजनेसाठी अटी, शर्ती, निकष हे जीआर निर्गमित करतानाच दिलेले असतात. आपण पाहिलेलं आहे की विविध शासनाच्या योजना राबवल्या जातात. या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी पात्रही होतात, अर्जही करतात. बऱ्याच वेळा यामध्ये अनुदानाचा लाभही घेतात. परंतु हा लाभ घेत असताना काही ठिकाणी काही गैरप्रकार देखील घडून येतात. मग असे जर काही गैरप्रकार घडून येत असतील किंवा असे जर काही लाभार्थी जे चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असतील, ते जर यामध्ये वगळले, तर त्यामध्ये गैर नसतं. आणि तशा प्रकारचे लाभार्थी वगळले देखील जातात. परंतु सरसकटच लाभार्थी वगळले जाणार, सरसकटच लाभार्थी बाद केले जाणार.-Ladki bahin yojana update 2024.

हे सुद्धा वाचाकोणत्या महिलांना मिळणार लाभ आणि योजनेत सहभगात कसा घ्यायचा?-Bima Sakhi Yojana 2024.

Leave a Comment