महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची घोषणा-Vidhan Sabha Maharashtra Election 2024

vidhan sabha maharashtra
vidhan sabha maharashtra

Vidhan Sabha Maharashtra Election 2024- नमस्कार मित्रांनो, अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर आज, 15 ऑक्टोबर 2024 रोजी, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूक(Vidhan Sabha Maharashtra Election) चा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. राज्यात निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आणि एकाच टप्प्यात 39 दिवसांमध्ये या निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे.

2024 पासून निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे. 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत हे अर्ज भरले जातील. 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांची छाननी असेल. 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत छाननी काढता येईल. 20 नोव्हेंबर 2024 रोजी राज्यभरात निवडणुकीचे मतदान घेतले जाणार आहे आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी मत मोजणी करून याचा निकाल जाहीर केला जाणार आहे. 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे कारण 26 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेचे कार्यकाल पूर्ण होणार आहे.

मित्रांनो, कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी निवडणुका घेतल्या जातील का, निवडणुका लांबवता येतील का अशा प्रकारच्या बऱ्याच चर्चा चालू होत्या. आणि या सर्वांचा पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आता निवडणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. राज्यातून जवळजवळ 9 कोटी 63 लाख मतदार हे मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत. यासाठी एकूण 1668 मतदान केंद्र असणार आहेत. आणि या मतदान केंद्रांच्या माध्यमातून या 9 कोटी 63 लाख मतदारांचा मतदानाचा हक्क बजावला जाणार आहे.

मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात असताना लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी आलेल्या समस्या आणि आकलन करून काही बदल करण्यात आलेले आहेत. दिव्यांग किंवा सीनियर सिटीझन नागरिकांना घर बसल्या मतदान करण्याची सोय असेल. याचबरोबर मतदान केंद्रं 2 किलोमीटरच्या परिघात असावीत, लांब लाइन असतील तर बसच्या खर्चाची व्यवस्था, पिण्याचे पाण्याची व्यवस्था, इतर काही व्यवस्था याची काटेकोरपणे काजी घेतली जाणार आहे.

आता एकाच टप्प्यात निवडणुका पार पाडल्या जाणार आहेत. त्यामुळे बरेच बोगस मतदार किंवा इतर काही प्रक्रिया आता होणार नाहीत. आणि अतिशय कमी कालावधीमध्ये सर्व मतदानाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात एक दिलासा देखील मिळणार आहे. कारण लांब चालणाऱ्या कार्यक्रमांमुळे आचार संहितेमुळे सामान्य शेतकऱ्यांना होणाऱ्या समस्याही टाळल्या जातील.

आता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. आता सर्वांचे लक्ष्य या निवडणुकीच्या निकालाकडे आहे. जसे जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीच्या निकालाकडे होते, तसेच आता महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या(Maharashtra Election) निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. राज्यात सध्या अनपेक्षित वातावरण आहे. त्रिशंकु होईल की चार शंकू होईल की पाच शंकू होईल, अशा विविध अटकळी लावल्या जात आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

आशा करूया की, अशी कोणतीही परिस्थिती उद्भवू नये आणि एक स्थिर सरकार पुढील पाच वर्षांसाठी राज्याला मिळावे. पुढच्या 40 दिवसांत मतदाना बरेच सारे प्रलोभन दिले जातील. परंतु, मतदार राजा जागरूक होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि एक चांगले सरकार राज्याला देऊन राज्याचा विकास करण्याचा प्रयत्न करावा. कारण राज्याचा विकास आणि राज्याचे भविष्य आपल्या एक मतादानाच्या हक्कात आहे.

हे सुद्धा वाचा– महिलांना आता लवकरच आपल्या खात्यावर दोन हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत- Ladki Bahin Yojana

Leave a Comment