Mukhyamantri Annapurna Yojana 2024- लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत

Mukhyamantri Annapurna Yojana 2024
Mukhyamantri Annapurna Yojana 2024

Mukhyamantri Annapurna Yojana 2024: नमस्कार मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील महिला लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या तीन मोफत गॅस सिलेंडर अनुदान योजनेच्या अर्थात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेले आहेत. ज्यामुळे आता राज्यातील लाखो महिला लाभार्थी या योजनेच्या लाभार्थी म्हणून पात्र होण्यासाठी मदत होणार आहे. याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा आणि दिलासादायक असा अपडेट आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मित्रांनो, राज्यामध्ये Mukhyamantri Annapurna Yojana/मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्यात आलेली आहे. याच्या अंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या ज्या महिला लाभार्थी आहेत, अशा जवळजवळ 52 लाख 16,000 महिला लाभार्थ्यांना डायरेक्टली पात्र करण्यात आलेले आहे. याच्या व्यतिरिक्त राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी, ज्यांच्या नावावरती गॅसचं कनेक्शन आहे, अशा महिला लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेच्या अंतर्गत पात्र करण्यात आलेले आहे. अशा महिला लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडर वाटप करण्यात आले आहे. याचाच अनुदान वितरणाची सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे. बऱ्याच महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर त्यांच्या अनुदानाचे पैसे आलेले आहेत. परंतु, एकंदरीत राज्यातील परिस्थिती पाहिली तर बऱ्याच महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन नाही. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत, परंतु तिच्या पतीच्या सासऱ्याच्या वडिलांच्या नावावरती गॅस कनेक्शन आहे अशा परिस्थितीमध्ये या योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांना या नावावरती गॅस सिलेंडर गॅस कनेक्शन असल्यामुळे या योजनेचा लाभ घेता येत नव्हता.

जीआर पाहण्यासाठी- इथे क्लिक करा

अशा परिस्थितीमध्ये आता राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनासाठी ठिरवण्यात आलेले जे काही निकष होते जे काही त्याच्या अंतर्गतच्या काही अटीशर्ती होत्या याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. याच्यासाठी 4 ऑक्टोबर 2024 रोजी एक महत्त्वाचा असा जीआर निर्गमित करून या योजनेच्या अंतर्गत आता जर एखाद्या महिला लाभार्थी जर मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेची लाभार्थी असेल आणि अशा महिला लाभार्थ्याच्या नावावरती जर गॅसचं कनेक्शन ट्रान्सफर केलं तर त्या महिलांच्या नावावरती गॅस कनेक्शन असेल म्हणजे ट्रान्सफर करण्यात आलेलं असेल तरी सुद्धा त्या महिला लाभार्थी आता या योजनेच्या अंतर्गत अनुदानासाठी पात्र होणार आहेत.

त्याच्यामुळे पतीच्या नावावरती असलेलं गॅसचं कनेक्शन आता महिलेच्या नावावरती ट्रान्सफर झालं तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची महिला लाभार्थी सुद्धा आता या मोफत गॅस अनुदान योजनेची लाभार्थी होणार आहे.

आता या करण्यात आलेल्या बदलामुळे राज्यातील लाखो महिला लाभार्थी पुन्हा एकदा या मोफत गॅस अनुदान योजनेच्या लाभार्थी म्हणून पात्र होण्यासाठी मदत होणार आहे आपल्या नावावरती जर गॅस कनेक्शन नसेल तर आपल्या पतीला सांगून आपल्या वडिलाला सांगून आपल्या सासऱ्याला सांगून आपल्या नावावरती ते गॅस कनेक्शन करून घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये अनुदान योजनेचे लाभार्थी म्हणून पात्र होण्यासाठी पात्र बना.

Leave a Comment