Namo Shetkari आणि PM kisan बद्दल नवीन सुधारणा

pm kisan
pm kisan

PM Kisan Yojana: राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांसाठी एक खूप मोठा, दिलासादायक आणि एक खूप मोठी गुड न्यूज आता समोर आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, आता तुम्हा सर्वांना माहिती आहे की मागील दोन दिवसांपूर्वी, म्हणजेच 5 ऑक्टोबर 2024 रोजी, राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून Namo Shetkari/नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत आणि PM Kisan/पीएम किसान महासन्मान निधी योजने अंतर्गत सर्व शेतकरी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ₹4000 वितरण करण्यात आले, जे की 5 ऑक्टोबर रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून झाले होते.

त्याचबरोबर, मागील चौथा हप्ता, जो की नमो शेतकरी योजना अंतर्गत आणि पीएम किसान योजना अंतर्गत 21 ऑगस्ट 2024 रोजी बीड येथे कृषी प्रदर्शन सोहळ्यामध्ये करण्यात आला होता. आता त्याच पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना अंतर्गत जो येणारा सहावा हप्ता आहे आणि पीएम किसान योजना अंतर्गत जो येणारा 19वा हप्ता आहे, त्या दोन्ही हप्त्यांची एकत्र तारीख आता जाहीर करण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनो, नेमकी तारीख कोणती आहे? किती तारखेला भेटणार आहे? सर्व काही माहिती आपण या ब्लॉगच्या माध्यमातून अगदी डिटेलमध्ये सविस्तरपणे जाणून घ्या.

शेतकरी बांधवांनो, आता सांगू शकतो की विधानसभेच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर आलेल्या आहेत. अगदी काही दिवसांत आचारसंहिता लागू होणार हे सर्वांना माहीत आहे. तर सांगू शकतो की राज्य शासनाने सर्व मतदारांना खुश करण्यासाठी एक खूप मोठा पाऊल उचललेला आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाचा देखील सहवास या योजनेमध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे, म्हणजेच राज्यातील उमेदवार निवडून आणण्यासाठी हे एक खूप मोठं ठोस पाऊल उचलल्याचं न्यूज समोर येऊ लागलंय.

शेतकरी बांधवांनो, राज्य शासनाने बऱ्याच योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केल्या आहेत, जसे की मुख्यमंत्री लाडकी योजना. या योजने अंतर्गत पुढील दोन हप्ते एकदाच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते. याच प्रमाणे, नमो शेतकरी आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनेचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

परंतु, त्यासाठी काही मुख्य कामे करावी लागणार आहेत. कारण यामध्ये काही बदल आणि अपडेट करण्यात आले आहेत. नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता वितरण झाल्यानंतर, बऱ्याच शेतकऱ्यांना काही अडचणी आल्या होत्या, जसे की लँड सेटिंग, आधार सेटिंग आणि काही शेतकऱ्यांचे स्टेटस अनऍक्टिव्ह असल्यामुळे त्यांच्या खात्यांमध्ये पैसे आले नाहीत. त्यामुळे एकदा नक्कीच चेक करणे गरजेचे आहे.

शेतकरी बांधवांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना अस्तित्वात आणली गेली आहे. तिच्या माध्यमातून लाडक्या शेतकरी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना राहिलेली सर्व थकीत पीक विमा, नुकसान भरपाई, अतिवृष्टी आणि गारपीट योजनेचे पैसे तातडीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या संदर्भातील सविस्तर माहिती दिली जाईल.

राज्य शासनाचा पूर्ण फोकस येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर आहे. ते शेतकऱ्यांना आणि मतदार भगिनींना खुश ठेवण्यासाठी काय काय कामे करणार याचा विचार करण्यात येत आहे. नमो शेतकरी आणि पीएम किसान योजना अंतर्गत येणारे हप्ते वितरण करण्याची तारीख आता शासनाने ठरवली आहे.

शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 20 ऑक्टोबर 2024 रोजी मिळण्याची शक्यता आहे.

जर काही कारणास्तव ते 20 ऑक्टोबरला मिळाले नाहीत, तर ते 1 जानेवारी 2025 पासून मिळतील.

हे सुद्धा वाचाAgrim Pik Vima 2024- सोयाबीन २५% पीकविमा मंजूर

Leave a Comment