Vihir Anudan yojana- या अगोदर विहीर खणण्यासाठी 2.5 लाख रुपये अनुदान होतं. आता त्यामध्ये 2 लाख रुपयांची वाढ होऊन हे अनुदान 4 लाख रुपये मिळणार आहे, आणि हे अनुदान अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे जे SC आणि ST या समाजातील आहेत. या शेतकऱ्यांसाठी अनुदान आहे. आता SC मधील नवबौद्ध घटकांसाठी, या अगोदर 2.5 लाख रुपये होतं, ते सुद्धा आता 2 लाखांची वाढ करून 4 लाख रुपये अनुदान करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये पुन्हा काही वेगवेगळी अनुदाने आहेत आणि पुन्हा ST समाजासाठी, म्हणजे आदिवासी समाजासाठीसुद्धा 1.5 लाखांची वाढ होऊन 2.5 लाखांवरून 4 लाख रुपये अनुदान करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आणखी सौर पंपासाठी अनुदान आहे, मोटर साठी अनुदान आहे, जे काही पुन्हा विहीर बांधणीसाठी अनुदान आहे. त्या जमिनीची अट किती आहे, अशी सर्व माहिती आपण आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
SC आणि ST साठी हे 4 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामध्ये पुन्हा मोटरसाठी अनुदान आहे, पाइपसाठी अनुदान आहे, सौर पंपासाठी अनुदान आहे, विहीर जुनी असेल तर बांधकामासाठी अनुदान आहे. असं सर्व किती अनुदान मिळणार, ही तर माहिती आपण घेणार आहोत. पण यासाठी अर्ज करणे सुद्धा सुरू झालं आहे.
विहीर अनुदान योजना 2024 साठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
यासाठी आपल्याला अर्ज करायला महाडीबीटीची जी वेबसाइट आहे, तिथे फार्मर लॉगिनमध्ये जायचं, आणि त्यामध्ये आपल्याला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विहिरीसाठी अर्ज(Vihir Anudan yojana) करता येणार आहे. त्यानंतर विहिरी बांधकामासाठी अर्ज करता येणार आहे. त्यानंतर जर सौर पंप बसवायचा असेल, तर त्यासाठी सुद्धा अर्ज करता येणार आहे. आणि त्यामाध्यमातून या शेतकऱ्यांना नवी विहीर बांधण्यासाठी किंवा विहीर खणण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान मिळणार आहे.
त्यानंतर जर जुनी विहीर असेल, आणि तिला बांधकाम करायचं असेल, तर याअगोदर 50,000 रुपये अनुदान मिळत होतं, मात्र आता त्यात सुद्धा वाढ करून 1 लाख रुपये अनुदान करण्यात आलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर महाडीबीटीवर जाऊन यासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. आणि इतर काय काय अनुदान आहे, ते आपण सविस्तर बघू.
नवीन विहिरीसाठी 4 लाख रुपये, विहीर दुरुस्तीसाठी 1 लाख रुपये, त्यानंतर इनवेल बोरिंगमध्ये बोर घेण्यासाठी 40 हजार रुपये, विद्युत पंप संचासाठी 40 हजार रुपये, वीज जोडणीसाठी 20 हजार रुपये, सौर पंप बसवण्यासाठी 50 हजार रुपये, शेततळं प्लास्टिक अस्तरीकरणासाठी 2 लाख रुपये, म्हणजे शेततळं घेतलं असेल, तर त्यावर प्लास्टिक अस्तरीकरण करण्यासाठी 2 लाख रुपये अनुदान असणार आहे.
त्यानंतर ठिबक संच बसवण्यासाठी 97,000 रुपये अनुदान मिळणार आहे. तुषार संचासाठी 47,000 रुपये अनुदान मिळणार आहे. डिझेल इंजिन घ्यायचं असेल, आणि आपल्या कडे विजेची सोय नसेल किंवा सौर पंप नसेल, तर त्यासाठी डिझेल इंजिनसाठी सुद्धा 40,000 रुपये अनुदान मिळणार आहे. त्यानंतर एसडीपी किंवा पीव्हीसी पाइपसाठी 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. पाइपलाइन करायची असेल, तर त्यासाठी सुद्धा 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
ट्रॅक्टर किंवा बैलचलित अवजारं, शेतीसाठी लागणारी जी काही अवजारं आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा 5 हजार रुपये अनुदान या माध्यमातून मिळणार आहे. पारसबाग तयार करण्यासाठी 5,000 रुपये अनुदान मिळणार आहे. आणि हे सर्व अनुदान मिळण्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्याला महाडीबीटीच्या वेबसाइटवर जाऊन यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करणे चालू झालं आहे. त्यामुळं लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांना या सर्व गोष्टींचा लाभ घ्यायचा असेल, त्यांनी महाडीबीटीवर फार्मर लॉगिनमध्ये जाऊन नोंदणी करावी. ज्या शेतकऱ्यांनी याअगोदर नोंदणी केली आहे, त्यांनी लॉगिन करून अर्ज करावा. लवकरात लवकर अर्ज केल्यास, त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळेल. अशी ही योजना आहे.
त्यामुळं SC आणि ST मधील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी 1 एकरची मर्यादा आहे, आणि काही भागांसाठी, अतिदुर्गम भागांसाठी ही 1 एकरची मर्यादा सुद्धा शिथिल करण्यात आलेली आहे. त्यामुळं प्रत्येक शेतकरी ज्यांच्याकडे जमीन आहे, पाण्याचा स्त्रोत आहे किंवा उपलब्ध होऊ शकतो, अशा शेतकऱ्यांनी या सर्व योजनांचा लाभ घ्यावा.
हे सुद्धा वाचा– सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हवी भावांतर योजना