Pik karj update 2024: मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे. आरबीआयच्या माध्यमातून एक जानेवारी 2025 पासून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीक कर्जासंदर्भात(Pik Karj) एक नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना दिली जाणारी विनातारण पीक कर्ज ही आता एक लाख 60 हजाराच्या ऐवजी दोन लाख रुपये करण्यात आलेली आहे. याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती, हा नेमका नियम काय आहे, हा कधीपासून लागू होणार आहे, याचे शेतकऱ्यांना काय फायदे होणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे, आणि शेतकऱ्यांना ही पीक कर्ज दोन लाख रुपये पर्यंत दिली जातात का, नेमकी पीक कर्ज किती मिळतात, हे सर्व सविस्तरपणे आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
6 डिसेंबर 2024 रोजी आरबीआयचे चीफ जनरल मॅनेजर श्री धरण यांच्या माध्यमातून एक पत्रक काढण्यात आलेले आहे. सर्व कमर्शियल बँका, ग्रामीण बँका या सर्व बँकांना उद्देशून हे पत्रक देण्यात आलेले आहे. ज्याच्यामध्ये फेब्रुवारी 2019 च्या ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत, या मार्गदर्शक सूचनानुसार पीक कर्ज देण्याची जी काही अंमलबजावणी केली जाते, त्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून दिली जाणारी पीक कर्जाची मर्यादा आता ₹160 हजाराच्या ऐवजी दोन लाख रुपये पर्यंत करण्यात आलेली आहे.
वाढती महागाई, शेतकऱ्यांचा वाढता खर्च या सर्व बाबींच्या अनुषंगाने आता ₹160 हजार रुपयांची मर्यादा ही दोन लाख रुपये पर्यंत करण्यात आलेली आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये आरबीआयच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती.
शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड(Kisan Credit Card) देण्यासाठी याच्या अंतर्गत सुरुवात करण्यात आलेली होती. याच किसान क्रेडिट कार्डच्या अर्थात केसीसीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना विनातारण ₹160 हजार रुपये पर्यंत कर्ज देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये 4% व्याजाने कर्ज उपलब्ध करून द्यायला मंजुरी दिलेली होती.
याच्या अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांची केसीसी काढण्यात आलेली होती. आता ऍग्री स्टेक योजना राबवली जाते, याच्या अंतर्गत देखील शेतकऱ्यांचे जे काही युनिक आयडी बनवून शेतकऱ्यांना केसीसी देण्यासाठीची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. अशाप्रकारे जे केसीसी उपलब्ध करून देण्यात येतील, त्या केसीसीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी विनातारण पीक कर्जाची मर्यादा ही आता दोन लाख रुपये पर्यंत करण्यात आलेली आहे. अर्थात, शेतकऱ्यांना आता विनातारण 4% व्याजदराने दिलं जाणार पीक कर्ज हे दोन लाख रुपये पर्यंत दिलं जाणार आहे.
राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर, या जे काही चार टक्के व्याजदर आहे, तो सुद्धा माफ करण्यात आलेला आहे. कारण शेतकऱ्यांना तीन लाख रुपये पर्यंतची पीक कर्ज ही शून्य व्याजदराने दिली जातात. यासाठी पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना जी आहे, ती व्याज सवलत योजना राबवली जात आहे.
याच बरोबर या जीआरच्या माध्यमातून आरबीआयच्या माध्यमातून आणखीन एक सूचना देण्यात आलेली आहे, ती म्हणजे तीन लाख रुपये पर्यंतच्या पीक कर्जाला व्याजदराचा 4% चा लाभ दिला जाणार आहे. अशा प्रकारच्या या दोन्ही बाबींचा जो काही लाभ आहे, हा शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावा, आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांना ही सुविधा दिली जात आहे. याची माहिती सुद्धा बँकेने आपले जे काही कर्जदार शेतकरी आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, अशा प्रकारच्या सूचना या जीआरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत.
आता हे सर्व झाल्यानंतर शेतकरी म्हणतात की आम्हाला ₹160000 काय, आम्हाला तर 50000 रुपये एकरं दिलं जातं, आमच्याकडे 60000 दिलं जातं, आमच्याकडे 40000 दिलं जातं. मुळात पीक कर्ज देत असताना आपण जर पाहिलं तर राज्यस्तरीय बँकर समितीच्या माध्यमातून पीक कर्जाचे दर हे प्रत्येक वर्षासाठी निश्चित केले जातात. आता 2024 मध्ये याची समितीची बैठक झाल्यानंतर त्याठिकाणी पीक कर्जाचे दर निश्चित करण्यात आले होते. की सोयाबीन असेल तर हेक्टरी किती द्यायचं, ऊस असेल तर किती द्यायचं, डाळिंब असेल तर किती द्यायचं, हरभरा असेल तर किती द्यायचं, ज्वारी असेल तर किती, बाजरी असेल तर किती, उडीद-मूग असेल तर किती. त्या दरानं तुम्हाला ती हेक्टरी पीक कर्जाची मर्यादा निश्चित केली जाते. परंतु केसीसीच्या अंतर्गत जी पीक कर्ज दिली जातात.
त्याच्यामध्ये तुमचं जे काही पीक कर्ज(Pik Karj) पीकजी असेल, त्या पिकाच्या अनुषंगाने हेक्टरी मर्यादा, याचबरोबर तुम्हाला मोटार खरेदी करायची असेल, तुम्हाला ट्रॅक्टरची अवजार खरेदी करायची असतील, तुम्हाला एखादी गाय-म्हैस खरेदी करायची असेल किंवा तुमच्याकडे असलेल्या अवजारांची दुरुस्ती करायची असेल, अशा सर्व बाबींसाठीचा त्यामध्ये समावेश करून त्या पीक कर्जाची मर्यादा ही ₹160000 पर्यंत करण्यात आलेली होती. आता ती पीक कर्जाची जी काही विनातारण मर्यादा आहे, ती ₹2 लाख रुपये पर्यंत करण्यात आलेली आहे.
त्यामध्ये आपण पाहिलं होतं की वर्षानुवर्षी त्याची देखील वाढ करण्यात येते, आणि आता ही वाढ ₹160000 होऊन ₹2 लाख रुपये पर्यंत करण्यात आलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आता हा नवीन जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे, नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत, आणि याची अंमलबजावणी सर्व बँकांच्या माध्यमातून 1 जानेवारी 2025 पासून करण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांची केसीसी काढली जातील. यासाठी आपण जर पाहिलं तर 15 डिसेंबर 2024 पासून राज्यभरामध्ये ऍग्री टॅक्सची अंमलबजावणी, शेतकऱ्यांची युनिक आयडी काढण्यासाठीच्या मोहिमा हाती घेण्यात आलेल्या आहेत.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांना युनिक आयडी दिल्या जातील, आणि त्यानंतर शेतकऱ्यांना जे काही पीएम किसानचे लाभ असतील, त्याच्या अंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना केसीसीचे वाटप केलं जाईल. आणि ज्या शेतकऱ्यांचे आधीच केसीसी आहेत, त्या शेतकऱ्यांना 1 जानेवारी 2025 पासून हा नवीन नियम लागू केला जाणार आहे.-Pik karj update 2024.
हे सुद्धा वाचा– शेतकऱ्यांना वार्षिक १२,००० राज्यात नमो शेतकरी योजना-2024.