Pm Kisan- सोयाबीन कापूस अनुदान अपडेट-2024

pm kisan
pm kisan

Pm Kisan- नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 अनुदान 30 सप्टेंबर रोजी वाटप केले होते, आणि दोन दिवसांपूर्वी देखील अजून अपडेट आले की ते शेतकऱ्यांच्या खात्यात चालू आहे. 96 लाख खातेदारांना दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान वाटप केले जाणार होते.

पहिल्या टप्प्यात राज्यातील 49 लाख 51000 खातेदारांना या अनुदानाचा लाभ मिळाला, आणि आता सामायिक खातेदारांना देखील अनुदान दोन दिवसांपूर्वी त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात डिपॉझिट झाले आहे. तर, नेमके अजून का एवढे डिले आहे, बाकीचे माहित नाही. ते सर्व गोष्टी आपण जाणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत वाचा.

कापूस आणि सोयाबीन पात्र असलेल्या राज्यातील एकूण खातेदारांची संख्या 996 लाख होती. राज्यातील 80 लाख वैयक्तिक तर 16 लाख संयुक्त खातेदार होते. वैयक्तिक खातेदारांपैकी 60 लाख खातेदारांचे आधार संमती पत्र कृषी विभागाला प्राप्त झाले होते. 60 ते 64 लाख संयुक्त खातेदार आणि 13 लाख वैयक्तिक खातेदारांचे संमती पत्र राहिले होते. ज्याला दिले त्यांचे अकाउंटमध्ये आता डिपॉझिट होत आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात एकूण 2398 कोटी रुपयांचे वाटप होऊन 49.50 हजार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये हे आलेले आहेत पैसे. त्यानंतर 10 दिवसात म्हणजे 10 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील एकूण 2564 कोटी रुपयांचे वाटप झाले होते.

सोयाबीन उत्पादन करणारे 55 लाख 25000 खातेदारांमधून 33 लाख 39000 शेतकरी आणि कापूस उत्पादन करणारे 22 लाख 37000 खातेदारांना हे वाटप झालेले आहे. तर, एकूण 67 लाख 69000 एवढे जे काही शेतकरी होते, त्यांचा आतापर्यंत 2564 कोटी रुपये वाटले गेले. तर नेमकी अडचण काय येत आहे? पात्र झालेले अनेक शेतकऱ्यांचे अद्याप अनुदान खात्यात जमा झालेले नाही. तसेच अनेक संयुक्त खातेदारांच्या खात्यांवर पैसे जमा झालेले नाहीत. वैयक्तिक आणि संयुक्त खातेदारांपैकी आपले आधार संमती पत्र कृषी सहाय्याकडे दिल्यानंतर अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.

तर संयुक्त खातेदारांसाठी सामायिक क्षेत्रात नावे असलेल्या सर्वांची स्वाक्षरी असणे गरजेचे आहे. हा महत्त्वाचा मुद्दा नोट करून घ्या. एकाच व्यक्तीच्या नावावर पैसे जमा केले जाणार आहेत, पण कोणाच्या नावावर किती क्षेत्र आहे त्यानुसार संयुक्त खातेदारांनी एकमेकांमध्ये ठराव करून वाटप करण्याचे आहे. त्यानुसार अनेक सामायिक खातेदार नोकरी-धंद्यानिमित्त बाहेरगावी असल्याने संमती पत्र देण्यात अडचणी येत आहेत. पण ज्या संयुक्त खातेदारांनी स्वाक्षरी करून संमती पत्र दिले आहे, त्यांच्या नॉमिनेट केलेल्या खात्यांमध्ये पैसे वर्ग करण्यात येणार आहेत, आणि हे झाले देखील आहे. त्यामुळे संयुक्त खातेदारांनी लवकरात लवकर आपले संमती पत्र देण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे, जेणेकरून त्यांना हा जो काही राहिलेला निधी तो त्यांच्या खात्यात ट्रांसफर करता येणार आहे.

तर आतापर्यंत एकूण खातेदार जे होते, ते 67 लाख 61000 पात्र होते, त्यापैकी शेतकऱ्यांची संख्या 5766 हजार होती, जे दोन कोटी रुपयांवर अनुदान वाटले गेले आहे. जे काही सामायिक खातेदार आहेत, त्यांना ज्या प्रमाणे सांगितले आहे की, ज्या शेतकऱ्यांचे सामायिक खाते आहे आणि ज्याच्या नावावर जास्त शेती आहे, त्यांना प्रेफरेंस दिली जाईल. असेही त्यांनी सांगितले आहे. जेणेकरून तुमचे जे काही अनुदान आहे किंवा ज्या सगळी डॉक्युमेंट्स आहेत, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात ते पैसे डिपॉझिट होतील. ज्यांना सामायिक खातेदार म्हणून सगळी कागदपत्रे देणे गरजेचे आहे. बहुतेक लोक बाहेरगावी असल्याने ते येत नाहीत, स्वाक्षरी करत नाहीत, आणि त्यामुळे अनुदान पेंडिंग आहे.

हे सुद्धा वाचाशेतकऱ्यांना दिलं जाणारं डिजिटल ओळखपत्र

Leave a Comment