Soyabean MSP Update- मित्रांनो, राज्यासह देशभरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे. याच्या संदर्भातील एक सविस्तर माहिती आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरीप हंगाम 2024-25 मध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, तसेच तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या सहा राज्यांमधून सोयाबीन हमीभाव खरेदीला मंजुरी दिलेली आहे. सोयाबीनसह इतर खरीप पिकांचे हमीभाव खरेदी केली जाणार आहे.
या खरेदीमध्ये जवळजवळ 13.8 लाख मेट्रिक टन सोयाबीन हे फक्त महाराष्ट्रातून खरेदी करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात खरेदीला 15 ऑक्टोबरपासून सुरुवात देखील झालेली आहे. मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे, तसेच मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. परंतु प्रत्यक्षामध्ये याचा शेतकऱ्यांना काहीही फायदा होताना दिसत नाही. ओलाव्याचं कारण सांगून शेतकऱ्यांचं सोयाबीन या खरेदी केंद्रांवर रिजेक्ट केलं जातंय. परिणामी, शेतकऱ्यांना 4892 हमीभाव निश्चित असताना सुद्धा 3800, 3900, 4000 ते 4200 रुपयांपर्यंत आपलं सोयाबीन विकावं लागत आहे.
मित्रांनो, अतिशय दयनीय अशी परिस्थिती सध्या शेतकऱ्यांची निर्माण झालेली आहे. हमीभावापासून प्रत्यक्षात असलेल्या भावामध्ये जवळजवळ 800 ते ₹900 रुपयांची तूट शेतकऱ्यांना दिसून येत आहे. हमीभाव खरेदी केंद्र सुरू असतानासुद्धा शेतकऱ्यांचं सोयाबीन या खरेदी केंद्रांवर विकलं जाऊ शकत नाही. याला महत्त्वाची अट होती ती म्हणजे ओलावा. मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर आणि सध्या राज्यामध्ये निवडणुका सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात नाराज होत असलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे.
15 नोव्हेंबर 2024 रोजी डिप्युटी कमिशनर एमएसपी विनोद कुमार यांच्या माध्यमातून सर्व राज्यांचे चीफ सेक्रेटरी (महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थान) यांना उद्देशून एक पत्रक काढण्यात आलेले आहे. या पत्रकात सोयाबीनच्या हमीभाव खरेदीसाठी निश्चित करण्यात आलेला ओलावा 12% वरून 15% पर्यंत वाढवण्यात आलेला आहे.
आता यामध्ये मॉईश्चरची जी काही अट होती, 12%, ती आता 15% करण्यात आलेली आहे. ओलावा 15% पर्यंत या ठिकाणी निर्धारित करण्यात आलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे शेतकऱ्यांचं सोयाबीन या हमीभाव खरेदी केंद्रांवर रिजेक्ट केलं जात होतं, ते आता रिजेक्ट होणार नाही. शेतकऱ्यांचं सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रांवर खरेदीसाठी स्वीकारलं जाईल.
आपण जर पाहिलं, तर गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे भाव साधारणपणे 4200 रुपयांपर्यंत येऊन स्थिर झाले आहेत. परंतु हमीभाव खरेदी केंद्रांवर खरेदी सुरू झाली, तर साहजिकच बाजारामधील आवक थोडीशी कमी होईल. हमीभाव केंद्रांवर सोयाबीन मोठ्या प्रमाणात वळेल. परिणामी, बाजारातील तणावाखाली असलेले भाव थोडेसे वरती जातील. साहजिकच याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
मित्रांनो, हा निर्णय घेताना थोडा उशीर झालेला आहे. हा निर्णय साधारणतः एक महिना किंवा 15 दिवसांपूर्वी घेणं अपेक्षित होतं. परंतु उशिरा का होईना, शासनाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. हा दिलासा जरी मिळाला असला तरी आपली, तसेच शेतकऱ्यांची एकच मागणी असणार आहे – या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजना लागू करावी लागेल.-Soyabean MSP Update 2024.
हे सुद्धा वाचा– या ७ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर-Kharip Pik 2024