सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाची मोठी खुशखबर-Soybean MSP 2024

Soybean MSP: मित्रांनो, खरीप हंगाम 2024-25 करता कृषी विभागाच्या माध्यमातून सोयाबीन या पिकाची हेक्टरी(Soyabean MSP) उत्पादकता जाहीर करण्यात आलेली आहे आणि याच्याशी संबंधित जिल्हानिहाय आकडेवारी, याउत्पादकतेचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे, याच्या संदर्भातील माहिती आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सर्वप्रथम पाहूयात याचे फायदे. याचे शेतकऱ्यांना दोन फायदे होणार आहेत. यामधील पहिला फायदा आपण पाहिलेले की सध्या सोयाबीन अतिशय कमी भावाने विकलं जातंय आणि या पार्श्वभूमीवरती शासनाच्या माध्यमातून या सोयाबीनची हमीभावानं(Soyabean Hami bhav) खरेदी करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे.

हमीभाव खरेदी केंद्रावर ₹4892 दर निश्चित करण्यात आलेला आहे. 15 ऑक्टोबरपासून सोयाबीनची हमीभाव खरेदी सुरू करण्यात आलेली आहे. परंतु ओलाव्याची आट व इतर काही कारणं सांगून अद्यापदेखील बिलकुल सोयाबीन या ठिकाणी खरेदी झालेलं नाही. अतिशय अल्प प्रमाणात, दोन ते तीन टक्के सोयाबीन निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या खरेदी करण्यात आलेलं आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी आग्रही आहेत.

यामध्ये शासनाच्या माध्यमातून ओलाव्यामध्ये काही अटी-शर्तींमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळं आता शेतकऱ्यांचे सोयाबीन पुन्हा एकदा खरेदी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे. ₹4892 रुपयांना दर हा हमीभाव खरेदी केंद्रावर दिला जाणार आहे. परंतु या हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विकलं जात असताना, नेमकं शेतकऱ्यांचे सोयाबीन किती खरेदी करायचं यासाठी काही मर्यादा ठेवली जाते, आणि ही मर्यादा त्या जिल्ह्याच्या प्रति हेक्टरी उत्पादकतेच्या जो दर असतो, त्यानुसार निश्चित केली जाते.

याच वरती आता हे हेक्टरी उत्पादकतेचे जे काही आकडे आहेत, ते जाहीर करण्यात आलेले आहेत. या आकडेवारीनुसारच आता त्या त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं त्या क्षेत्र मर्यादेनुसार सोयाबीन खरेदी केलं जाणार आहे. कारण याचा गैरवापर व्यापाऱ्यांच्या माध्यमातून सोयाबीनच्या हमीभाव खरेदी केंद्रावर विक्रीसाठी होतो. असे मोठे प्रकार या ठिकाणी घडून येतात. यावर आळा बसवण्यासाठी ही उत्पादकता शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

दुसरं आपण पाहिलेलं आहे की जरी ₹4892 भाव निश्चित केलेला असला, तरी शेतकरी आता सोयाबीन विकत असताना ₹4200 दराने विकत आहेत. याच पार्श्वभूमीवरती, निवडणुका सुरू असतानाच दोन्ही बाजून शेतकऱ्यांसाठी एक घोषणा केलेली होती. ती म्हणजे सोयाबीनला एक आधारभूत किंमत देण्याची किंवा त्यावर काहीतरी अनुदान देण्याची अर्थात भावांतर योजना राबवण्याची. जर शासनाच्या माध्यमातून आता या पार्श्वभूमीवर ही जी काही भावात पडलेली तूट आहे, ती भरून काढण्यासाठी जर भावांतर योजना राबवली, तर त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना या आकडेवारीचादेखील फायदा होऊ शकतो.

जर हेक्टरी आकडेवारी जाहीर केली, तर त्यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी वरती फायदा होईल. परंतु जर प्रति क्विंटल आकडेवारी जाहीर केली, तरीसुद्धा शेतकऱ्यांना या आकडेवारीच्या मदतीने या ठिकाणी अनुदान देण्यासाठी फायदा होऊ शकतो.

अशा प्रकारे महत्त्वाची अशी जी उत्पादकतेची आकडेवारी आहे, ती आता कृषी विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याची सर्वाधिक 26 क्विंटल प्रति हेक्टर एवढी सोयाबीनची उत्पादकता जाहीर करण्यात आलेली आहे. त्याच्या पाठोपाठ कोल्हापूरमध्ये 23 क्विंटल प्रति हेक्टर अशी आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे.

सर्वात कमी उत्पादकता जी जाहीर करण्यात आलेली आहे, ती गडचिरोली जिल्ह्याची. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सोयाबीनची प्रति हेक्टरी उत्पादकता 6.56 क्विंटल एवढी दाखवण्यात आलेली आहे.

  • बीड – 9.50 क्विंटल प्रति हेक्टर
  • नाशिक – 13.95 क्विंटल प्रति हेक्टर
  • धुळे – 14.50 क्विंटल प्रति हेक्टर
  • नंदुरबार – 14.99 क्विंटल प्रति हेक्टर
  • जळगाव – 10 क्विंटल प्रति हेक्टर
  • यवतमाळ – 14.31 क्विंटल प्रति हेक्टर
  • वर्धा – 12 क्विंटल प्रति हेक्टर
  • नागपूर – 11 क्विंटल प्रति हेक्टर
  • भंडारा – 11 क्विंटल प्रति हेक्टर
  • चंद्रपूर – 15 क्विंटल प्रति हेक्टर
  • अमरावती – 18 क्विंटल प्रति हेक्टर
  • वाशिम – 16.70 क्विंटल प्रति हेक्टर
  • अकोला – 14.50 क्विंटल प्रति हेक्टर
  • बुलढाणा – 15 क्विंटल प्रति हेक्टर
  • हिंगोली – 14 क्विंटल प्रति हेक्टर
  • परभणी – 15 क्विंटल प्रति हेक्टर

सातारा जिल्ह्याची उत्पादकता सर्वाधिक असून, सांगली (19.07 क्विंटल) आणि कोल्हापूर (23 क्विंटल) हे जिल्हे पुढे आहेत.

तर मित्रांनो, ही उत्पादकता कृषी विभागाच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आलेली आहे, आणि याच उत्पादकतेच्या मर्यादेमध्ये आता शेतकऱ्यांचं सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर खरेदी केलं जाणार आहे.-Soyabean MSP Update 2024.

हे सुद्धा वाचालाडक्या बहिणींना आता ₹२१०० फिक्स

Leave a Comment