Stamp Paper For Affidavit- मित्रांनो, प्रतिज्ञापत्रांसाठी नेमका स्टॅम्प(Stamp Paper) कोणता वापरायचा, कोणता स्टॅम्प चालणार — 100 चा की 500 चा — हा एक मोठ्या प्रमाणात विचारला जाणारा प्रश्न आहे. एक मोठ्या प्रमाणात विचारली जाणारी माहिती आणि तिच्या संदर्भातील सविस्तर माहिती तुमच्यासाठी नक्की उपयोगी पडेल अशी माहिती आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
14 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यशासनाच्या माध्यमातून एक राजपत्र निर्गमित करण्यात आले, ज्या राजपत्राच्या माध्यमातून 100 च्या स्टॅम्पऐवजी 500 चा स्टॅम्प आणि 500 च्या स्टॅम्पऐवजी 200 चा स्टॅम्प असा बदल करण्यात आला. या 12/2024 च्या गॅझेट म्हणजेच 14 ऑक्टोबर 2024 च्या नवीन राजपत्रानुसार या नवीन अध्यादेशानुसार 100 आणि 200 च्या स्टॅम्पऐवजी 500 चा स्टॅम्प करण्यात आला.
आता, राजकीय निवडणुका सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात याचा प्रचार-प्रसार करण्यात आला. अखेर याच कारणास्तव 30 ऑक्टोबर 2024 रोजी नोंदणी महानिरीक्षकांच्या माध्यमातून एक पत्र काढून सरकारने यासंदर्भातील स्पष्टीकरण द्यावे लागले. नोंदणी महानिरीक्षकांच्या माध्यमातून सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्रदेखील लिहण्यात आले. ज्या पत्रात शासनाच्या माध्यमातून स्टॅम्प पेपर(Stamp Paper) केवळ मोठ्या बाबींमध्येच मागितला जावा, छोट्या-मोठ्या बाबींमध्ये प्रतिज्ञापत्र मागितले जात होते. आता उत्पन्नाचे प्रमाणपत्र असेल किंवा इतर नॉन-क्रिमिनल असेल, जातीचे प्रमाणपत्र असेल अशा बाबींमध्ये सुद्धा जे काही स्टॅम्प पेपरचा आग्रह धरला जात होता तो आग्रह धरला जाऊ नये आणि तसा निर्देश देण्यात आलेला आहे.
आता या निर्देशात ज्या संदर्भात उल्लेख करण्यात आले होते, हा काही नवीन जिआर नाही, हा नवीन राजपत्र नाही. 14 ऑक्टोबर 2024 रोजी आलेल्या राजपत्रामुळे स्टॅम्प वाढून 5 रुपयांचा स्टॅम्प करण्यात आलेला आहे. यापूर्वी 1 जुलै 2004 रोजी एक राजपत्र निर्गमित करण्यात आले होते, ज्या राजपत्राच्या माध्यमातून जिथे गरजेचे नाही अशा बाबींमध्ये प्रतिज्ञापत्र सादर केले जातात.
अशा प्रतिज्ञापत्रांसाठी स्टॅम्प ड्युटीची गरज नाही; ते तुम्ही स्वयंघोषणा पत्राच्या माध्यमातूनही देऊ शकता असे त्या राजपत्रात नमूद आहे. त्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून सप्टेंबर 2015 मध्ये आणि 12 मे 2015 रोजी एक राज्य शासनाच्या माध्यमातून परिपत्रक काढण्याचे आदेश दिले. परंतु, काही अधिकारी याकडे लक्ष देत नव्हते किंवा त्याबद्दल कोणी ऐकायला तयार नव्हते. प्रत्येकवेळी प्रतिज्ञापत्र मागितले जात होते, आणि 10, 20, 50 रुपयांचा स्टॅम्प मागितला जात होता. पण प्रत्यक्षात जर पाहिलं तर अशा स्टॅम्प पेपरची गरज नव्हती, पूर्वी नव्हती आणि आता ही नाही. परंतु, सध्या 100 रुपयांचा स्टॅम्प 500 ला झाल्यामुळे ही बाब मोठ्या प्रमाणात निदर्शनात आली आणि म्हणूनच जुलै 2004 चा जो अध्यादेश आहे, मे 2015 चा जिआर आहे, या सर्वांचा उल्लेख करून हे निर्देश देण्यात आले आहेत.
आता जर पाहिलं तर जाती प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र, तुमचं नेशनलिटी प्रमाणपत्र किंवा इतर काही छोट्या-मोठ्या बाबी असतात, ज्या विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्यांना आवश्यक असतात. या ठिकाणी सुद्धा सरसकट हे स्टॅम्प पेपर मागितले जात होते. विविध शासकीय योजना, जसे लाडकी बहीण योजना, कपूस आणि सोयाबीन अनुदान, इत्यादी ठिकाणी सुद्धा स्वयंघोषणा पत्र द्यायचे होते. परंतु अफिडेविट कंपल्सरी नाहीये आणि अशा ठिकाणी स्वयंघोषणा पत्र वापरले जावे असे निर्देश दिले आहेत.-Stamp Paper For Affidavit Update 2024.
हे सुद्धा वाचा– ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान भारत कार्ड 2024.