Mukhyamantri Vayoshri Yojana: ज्या-ज्या ज्येष्ठ नागरिकांनी वयोश्री योजनेअंतर्गत 3000 रुपये अनुदानासाठी फॉर्म भरले होते. तर अशा लाभार्थी खात्यांमध्ये आर्थिक मदत शासना मार्फत पोचवायला सुरुवात झालेली आहे. कोण कोणत्या लाभार्थी खात्याचे लाभार्थी या योजनेचे पात्र होते? आणि नियम काय होते, याची संपूर्ण माहिती इथे मिळेल. ज्यांच्या खात्यात आलेलं नसेल, त्यांनी काय करायचं, याची सुद्धा सविस्तर कल्पना देणार आहोत.
शासनाकडून आता जीआरच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या बद्दलची घोषणा करण्यात आलेली आहे की, 14 ऑक्टोबर पर्यंत ज्या-ज्या लाभार्थींनी आतापर्यंत या योजनेअंतर्गत ऑफलाइन पद्धतीने फॉर्म भरले आहेत. ऑफलाइन पद्धतीने कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायचे होते? तर आशा सेविका, आपल्या गावातील ज्या आशा सेविका आहेत, त्यांच्यामार्फत सुद्धा फॉर्म भरून घेतले होते. त्याच बरोबर आपल्या ग्रामपंचायतीमधून सुद्धा, या फॉर्मचं सबमिटिंग केलं जात होतं.
आता कोणत्या ठिकाणी ग्रामपंचायतीत होतं? तर कोणत्या ठिकाणी आशा सेविका वर्कर आहेत, त्यांच्या मार्फत हे फॉर्म भरून घेतले जात होते. आता, या योजनेचा कोणते लाभार्थी पात्र होते याबद्दल थोडक्यात माहिती देऊ या. तर, या योजनेत शासनाकडून वयोमर्यादा देण्यात आली होती. म्हणजे 65 वर्षांवरील स्त्री किंवा पुरुष या दोघांनाही मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा(Mukhyamantri Vayoshri Yojana) लाभ घेता येणार होता. त्यामुळे 65 वर्षांवरील ज्या-ज्या लाभार्थींनी ऑफलाइन पद्धतीने आपले फॉर्म भरलेले होते, असे संपूर्ण लाभार्थी या योजनेचे पात्र धरले जाणार आहेत.
आता आपण फॉर्म भरताना आपण कागदपत्रं जी दिली, त्यामध्ये आपलं आधार कार्ड होतं, बँक पासबुक होतं, आपला आयडी साइज फोटो होता, आणि योजनेचा फॉर्म होता. त्याच बरोबर उत्पन्नाचं स्वघोषणा पत्र सुद्धा त्या ठिकाणी जोडून घेतलं आहे. अशा पद्धतीने काही कागदपत्रं होती. तर, ही कागदपत्रं आशा सेविकांकडे द्यावी लागली होती. ही संपूर्ण कागदपत्रं गोळा झाल्यानंतर तुमच्या गावामधील एक गट तयार करून घेतला जात होता.
तो संपूर्ण गट आपल्या जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागात जमा करण्यात येत होता. तर ज्या-ज्या लाभार्थ्यांचे फॉर्म संबंधित विभागात जमा झालेले आहेत, विभागामार्फत ज्या लाभार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरले आहेत, त्यांची पडताळणी झालेली आहे. तर अशा संपूर्ण लाभार्थी खात्यांमध्ये 3 हजार रुपयांची रक्कम शासनामार्फत वर्ग करण्यात आलेली आहे. आता या योजने अंतर्गत जे लाभार्थी पात्र ठरले आहेत, त्यांची संख्या शासनामार्फत जाहीर केलेली आहे. 4,113 लाभार्थी पात्र ठरलेले आहेत.
ज्या खात्यांमध्ये आर्थिक मदत पाठवण्यात आलेली आहे, त्या आर्थिक मदतीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिलेला आहे. जवळपास 12.63 कोटी रुपये एवढा निधी शासनामार्फत उपलब्ध करण्यात आलेला आहे. संबंधित लाभार्थी खात्यांमध्ये हा निधी वर्ग करण्यात आला आहे. त्याबाबत मेसेज त्यांच्या मोबाईलवर आले आहेत किंवा बँक पासबुकवर छाप मिळाली आहे. त्या संदर्भात मी तुम्हाला पुढील भागात सविस्तर माहिती देणार आहे. सविस्तर स्क्रीनशॉट बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की, तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही.
शासनामार्फत स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की, 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत ज्या-ज्या लाभार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत, त्यांनाच शासनामार्फत पात्र ठरवण्यात येत आहे. परंतु, ज्या-ज्या लाभार्थ्यांचे बँक पासबुक दिलेले आहेत, त्यामध्ये जर डीबीटी लिंक असेल, तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम शासनामार्फत वितरित करण्यात आलेली आहे.
आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपलं आधार कार्ड आपल्या बँकेला लिंक करून घ्यायचं आहे. आपली डीबीटी केली पाहिजे, केवायसी केली पाहिजे. जर तुम्ही केवायसी केली, डीबीटी केली, तर या योजनेचं अनुदान लाभार्थी खात्यावर वितरित केलं जाईल. अन्यथा तुम्हाला शासनामार्फत कोणतंही अनुदान दिलं जाणार नाही. कारण शासनामार्फत हे अनुदानाची रक्कम ही डीबीटी मार्फतच वितरित केली जाते. म्हणजेच, शासनाकडून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम पाठवली जाते.
त्यामुळे आपलं अनुदान डीबीटी लिंक असणं खूप गरजेचं आहे. आधार कार्ड आपल्याबँकेत लिंक असणं आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपलं बँक खातं लिंक करून घ्या. जेणेकरून पुढच्या टप्प्यात जो दुसरा हप्ता असेल, तो आपल्याला वेळेत मिळू शकेल. आतापर्यंत 4 लाख लाभार्थी खात्यांमध्ये शासनामार्फत अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. परंतु अजूनही काही बाकी असतील, त्यांची पडताळणी सुरू आहे. तर, या पडताळणीमध्ये पात्र लाभार्थी असतील, तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम डीबीटी लिंक असेल, तर पाठवण्यात येईल. अन्यथा कोणतंही अनुदान शासनामार्फत पाठवलं जाणार नाही.
वयोश्री योजनेचं अनुदान शासनामार्फत आता पाठवण्यात येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर ज्या काही आपल्या अडचणी किंवा त्रुटी असतील, त्या पूर्ण करून घ्या, जेणेकरून अनुदान आपल्या खात्यात जमा होताना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये.
हे सुद्धा वाचा– 75% पीक विमा कधी मिळतो?-2024