या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हाप्त्याच वितरण सुरू-Ladki Bahin Yojana 2024

Ladki Bahin Yojana 2024: मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या परंतु अद्याप एकही हप्त्याचे वितरण न झालेल्या पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण व्हायला सुरू झालेले आहे. मग या महिला नेमक्या कोणत्या आहेत? कोणत्या महिलांच्या खात्यावरती या हप्त्याचे वितरण होत आहे? हप्त्याचे वितरण का झालं नव्हतं? आपल्याला हप्त्याचे वितरण होईल का? असे अनेक सारे प्रश्न येतात आणि याच्या संदर्भातील काही महत्त्वाची अशी माहिती आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काही महिलांना लाभार्थ्यांच्या माध्यमातून जुलै-ऑगस्टमध्ये अर्ज करण्यात आले, ते अर्ज पात्र देखील झाले, मंजूर देखील करण्यात आले. परंतु त्या महिला लाभार्थ्यांचं आधार सीडिंग नसल्यामुळे, बँकेला आधार सीडिंग न झाल्यामुळे, एनपीसीआयला आधार मॅपिंग नसल्यामुळे त्या महिला लाभार्थ्यांच्या एकही हप्त्याचं वितरण झालेलं नव्हतं. या महिला लाभार्थ्यांच्या खात्यावरती हप्ता वितरणासाठी सप्टेंबरमध्ये प्रयत्न करण्यात आले होते.

ऑक्टोबरमध्ये प्रयत्न करण्यात आले होते, परंतु या दोन्ही हप्त्याचं वितरण हे फेल झालेलं होतं. अशा महिला लाभार्थ्यांना अद्याप एकही हप्ता वितरित करण्यात आलेला नव्हता. आणि आता, त्या महिला लाभार्थ्यांचं जे आपण पाहिलं होतं की काही मोहिमा राबवल्या होत्या, काही शिबिरे राबवली होती. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये किंवा इतर बँकेमध्ये आपलं आधार सीडिंग करण्यासाठी आव्हान करण्यात आलेलं होतं. आणि ज्या महिला लाभार्थ्यांचे आधार सीडिंग पूर्ण झालेले आहेत, अशा महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता त्यांच्या हप्त्याचं वितरण व्हायला सुरू झालेले आहे.

काही महिला लाभार्थ्यांची जुलैमध्ये केलेले अर्ज आहेत, त्यांचे पूर्णच्या पूर्ण हप्ते, अर्थात ₹7500. काही महिला लाभार्थ्यांचे ऑगस्ट-सप्टेंबरचे अर्ज आहेत, त्यांच्या खात्यामध्ये ₹3000 अशी रक्कम ही आता वितरित करायला सुरू झालेली आहे. आता आपली जर आणखी रक्कम आलेली नसेल, तर का आली नाही हे आपण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा चेक करू शकता. यासाठी आपल्याला आपल्या अर्जाची स्थिती चेक करायची आहे. अर्जाची स्थिती जर बरोबर असेल, तर आपल्याला एनपीसीआयला आपल्या आधार मॅपिंगची स्थिती चेक करायची आहे.

मित्रांनो, अर्जाची स्थिती चेक करण्यासाठी लाडकी बहीण योजनेचे जे पोर्टल आलेलं आहे, त्या पोर्टलवरती आणखीन डाटा दाखवत नाही. परंतु जे जुनं लाडकी बहीण योजनेचं पोर्टल आहे, ज्यामध्ये अर्ज केलेले आहेत, त्या पोर्टलवरती तुम्ही तुमचा मोबाईल नंबर, तुमचा पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता.

लॉगिन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या अर्जाची, “मी अर्ज केलेले,” जे अर्ज आहेत, त्याच्या अंतर्गत तुमचा अर्ज दाखवला जाईल. त्या अर्जामध्ये आपण पाहू शकता की आपला अर्ज किती तारखेला मंजूर झालेला आहे. त्याची तारीख दाखवली जाते आणि याच्याच बाजूला हप्ता वितरणाची स्थिती दाखवली जाते.

आता हप्ता वितरणाच्या स्थितीमध्ये आपण पाहू शकता, ज्या लाभार्थ्यांचे अर्ज पूर्वी मंजूर झालेले आहेत, एक हप्ता, दोन हप्ता, हप्त्याचं वितरण आपण पाहू शकता. ₹3000 आणि ₹7500 दोन वेळेस या खात्यावरती पैसे क्रेडिट करण्याचे प्रयत्न केले गेलेले आहेत. दोन्ही फेल झालेले आहेत आणि कारण आहे “आधार सीडिंग नॉट डन”, म्हणजे आधार सीडिंग न झाल्यामुळे पैसे वितरित करण्यात आलेले नाहीत.

आता असं जर असेल, तर मग आता पैसे येतील का? नाही, येतील. आता जर तुमचं आधार सीडिंग या हप्ता वितरणाच्या तारखेनंतर झालं असेल, तर आपल्या खात्यामध्ये पैसे येतील. आता यासाठी काय करायचंय? तुम्ही आधार मॅपिंग आधारच्या वेबसाईटवरती बँक सीडिंग स्टेटस पाहू शकता किंवा एनपीसीआयच्या पोर्टलवर सुद्धा पाहू शकता. वेबसाईटवरती तुमच्या आधार सीडिंगची स्टेटस सुद्धा तुम्ही चेक करू शकता. मॅपिंग स्टेटस सुद्धा चेक करू शकता.

याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. त्याठिकाणी तुम्हाला कॅप्चा कोड, ओटीपी टाकायचा आहे. आणि ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला स्टेटस दाखवली जाईल की तुमचा आधार बँकेशी लिंक आहे का? ते डीबीटीसाठी एनेबल केलेलं आहे का? याठिकाणी कधी केलेले आहे, त्याची तारीख दाखवली जाईल. आपण पाहू शकता की 7 ऑक्टोबरला हप्ता वितरण झाला आणि या लाभार्थ्याचं आधार सीडिंग हे 9 ऑक्टोबरला झालेलं आहे. अर्थात तो हप्ता वितरणाची प्रक्रिया फेल झाल्यानंतर हे आधार मॅपिंग झालेले आहे. म्हणून आता पुढील जो प्रयत्न केला जाईल, त्या प्रयत्नामध्ये हे खात्यामध्ये पैसे येणार आहेत.

अशा प्रकारे, ज्या-ज्या महिला लाभार्थ्यांची आधार सीडिंग झालेली आहेत, होत आहे, त्या-त्या महिला लाभार्थ्यांना हप्त्याचं वितरण केलं जात आहे. लवकरच शासनाच्या माध्यमातून आता डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याच्या वितरणाची सुद्धा तारीख स्पष्ट जाहीर केली जाईल. हप्त्याचं वितरण करण्याची प्रक्रिया पुढे चालू केली जाईल.-Ladki Bahin Yojana Update 2024.

हे सुद्धा वाचासोयाबीन कापूस अनुदान प्रक्रिया सुरू-2024

Leave a Comment